प्राथमिक आरोग्य केंद्र: काष्टी, उपकेंद्र: निमगाव खलू, गाव: निमगाव खलु, तालुका: श्रीगोंदा, जिल्हा: अहमदनगर, आशाचे स्वयंसेविकेचे नाव: सौ.निर्मला प्रविण बोत्रे रा.निमगाव खलू…
या ‘काष्टी’ प्रा.आ.केंद्रा अंतर्गत निमगाव खलू उपकेंद्र येथे दहा वर्षापासून कार्यरत आहेत. निर्मलाताईंना समाज सेवेची व आरोग्य सेवेची पहिल्या पासुनच मनातुन खुप आवड आहे. जनसेवा करताना त्या सर्व देहभान विसरून आशा स्वयंसेविकेचे काम करतात.

त्यांनी “माझे कुटुंब माझी जबाबदारी” या शासनाच्या प्रभावी मोहिमेचा सर्वे त्यांची स्वतः ची मुलगी प्रसूतीला आईकडे आलेली असतांना या जबाबदारीच्या कालावधीत स्वतःच्या मुलीच्या प्रसूती कालावधीत मुलीची व तिच्या नवीन बाळाची काळजी घेणे. असे जिकरीचे काम प्रभावीपणे पेलून स्वतः आजारी असूनही शासनाच्या या आसमानी कोरोना संकटाला सामोरे जाणेकामी सुरू केलेली दमदार मोहीम “माझे कुटूंब माझी जबाबदारी” दिवसा गावात घरोघरी जाऊन सर्वेक्षण करून जे ऑनलाईनचे काम प्रत्यक्ष ग्रामीण रुग्णालय, दौड येथे रात्र जागून काढून संगणकीय माहिती भरण्याचे व शासनाला माहिती वेळेत पुरविण्याचे काम प्राथमिक आरोग्य केंद्र काष्टी अंतर्गत प्रथम पूर्ण करून खरे माझे कुटुंब माझी जबाबदारी काय असते ? हे दाखवून दिले.
निमगाव खलू गावातील ग्रामपंचायत कर्मचारी व सरपंच पती श्री.संदिप रंगनाथ कलगुंडे प्राथमिक शाळा, निमगाव खलू येथे अलगिकरण कक्षात या मोहिमे दरम्यान कुटुंबातील दोन सदस्य करोना योद्धा म्हणून, सामना करत असतांना त्यांची नित्यनियमाने काळजी घेणे, त्यांना मानसिक आधार, SPO2 तपासणी, तापमान मोजणे, अश्या चाचण्या नित्यनियमाने घेऊन, कोरोना युद्ध जिंकण्यास खऱ्या अर्थाने प्रशासनाची जबाबदारी काय असते ? हे दाखवून देत त्यांना यशस्वी पणे बरे केले. कोरोना काळात गाव बऱ्याच वेळा बफर झोन व प्रतिबंधात्मक झोन मध्ये होते, यावेळी यशस्वी पणे कोणताही गावकरी बाधित न होऊ देता, समर्थपणे गावाची जबाबदारी सांभाळणारे सरपंच पती श्री.संदिप कलगुंडे व ग्रा.प. कर्मचारी श्री.महेश भोसले व ग्रामस्तरीय कोरोना समिती मौजे, निमगाव खलु या सर्वांनी या भगिनीचे आभार मानले.
सर्वे करतांना त्यानी स्वतःचा विचार केला नाही. तसेच, आपल्या प्रसूती झालेल्या मुलीचा विचार करत शासनाची ही करोना उपाय योजनेची जबाबदारी यशस्वीपणे पार पाडली. आणि पुढील काळातही पाळत आहेत. त्यांचे माझा गाव कोरोना मुक्त कसा होइल ? येवढेच लक्ष होते.! दरम्यान निर्मलाताई मोहिमेच्या काळात आजारी होत्या. तरी पण त्यांनी माघारी न घेता सर्वे पूर्ण केला आणि त्या सर्वेची “My Family My Responsibility” या अँपमध्ये १७६ कुटुंबाची ८७० लोकसंख्या डाटा एन्ट्री पूर्ण केली. त्यात त्यांच्या पतिने त्याना मोलाचे सहकार्य केले. ते त्यांच्यासोबत स्वयंसेवक म्हणूनच काम करत आहेत.
निर्मलाताईं आजारी असतांना स्वतःच्या जीवाची पर्वा न करता अहोरात्र जनसेवा करत होत्या. या अश्या कोरोना योद्धा आहेत, ज्यांनी स्वतःची काळजी न करता “माझे कुटुंब माझी जबाबदारी” ही शासनाची मोहीम यशस्वीरीत्या पार पाडून सर्वेक्षण पूर्ण केले. अशा करोना योध्यास गावातील सर्व ग्रामस्थ, पदाधिकारी, आशा प्रवर्तक, आरोग्य कर्मचारी, ग्रामपंचायत प्रशासक, ग्रामविकास अधिकारी यांच्याकडून मानाचा मुजरा व सलाम.
शब्दांकन:सौ.छाया शिंदे,आ.प्रवर्तक, निमगाव खलू
स्रोत:(मिराताई शिंदे,श्रीगोंदा)
