रामनवमी उत्सव निमित्त श्रीगोंद्यात अखंड हरिनाम सप्ताह आणि ज्ञानेश्वरी पारायण..

दिनांक ३० मार्च २०२५,श्रीगोंदा:

श्रीगोंदा येथील श्रीरामाचे पठार ट्रस्टच्या वतीने बाळारतळ येथील श्रीराम मंदीरात रामनवमी उत्सवानिमित्त ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण व अखंड हरिनाम सप्ताहाला आज दिनांक ३० मार्च २०२५ पासून शुभारंभ झाला आहे. भक्तिमय वातावरणात सुरू झालेल्या या सप्ताहामध्ये विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

दैनंदिन कार्यक्रमाचे स्वरूप:

  • पहाटे ४ ते ६ – काकडा भजन
  • सकाळी ७ ते १० – श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण
  • दुपारी ५ ते ६ – प्रवचन
  • संध्याकाळी ६ ते ७ – हरिपाठ
  • रात्री ७ ते ९ – हरिकिर्तन
  • त्यानंतर भोजन व हरिजागर

या संपूर्ण कार्यक्रमाचे व्यासपीठ चालक सुभाष आळेकर आहेत.

प्रमुख कीर्तनकार आणि त्यांचे कीर्तनाचे वेळापत्रक:

  • ३० मार्च – ह.भ.प. माऊली महाराज म्हस्के, चाडगाव
  • ३१ मार्च – ह.भ.प. श्यामसुंदर महाराज ढवळे
  • १ एप्रिल – ह.भ.प. संजय महाराज सायकर
  • २ एप्रिल – ह.भ.प. नवनाथ महाराज ग्रुप
  • ३ एप्रिल – ह.भ.प. गरुडस महाराज जगताप, आळंदी
  • ४ एप्रिल – ह.भ.प. पद्माकर महाराज देशमुख, नाशिक
  • ५ एप्रिल – ह.भ.प. सागर महाराज दिंडे, नाशिक
  • ६ एप्रिल (सकाळी ९ ते ११) – ह.भ.प. शिवानंद महाराज शास्त्री, चित्रकुटधाम

या कीर्तन सोहळ्यात हभप शिवानंद महाराज शास्त्री यांच्या काल्याच्या कीर्तनाने अखंड हरिनाम सप्ताहाची सांगता होणार आहे. यानंतर महाप्रसादाच्या कार्यक्रमाने या भक्तीमय सोहळ्याची सांगता होईल.

या कार्यक्रमाचा लाभ श्रीरामाचे पठार ट्रस्टचे अध्यक्ष नंदकुमार ताडे, सुरेश आळेकर, काळुराम ताडे, प्रकाश ताडे, शिवराज ताडे, रुपेश ताडे, राजु ताडे आणि इतर भक्तगणांनी घेतला आहे. उत्सवाच्या यशस्वी आयोजनासाठी त्यांचे विशेष योगदान आहे.

स्रोत:(प्रसिद्धी पत्र)

Advertise…

Leave a Reply