साहित्यरत्न डॉ.अण्णाभाऊ साठे यांच्या १०४ व्या जयंती निमित्त श्रीगोंद्यात भव्य उत्सव..

दिनांक ३१ जुलै २०२४, श्रीगोंदा:

साहित्यरत्न डॉ. अण्णाभाऊ साठे यांच्या १०४ व्या जयंतीनिमित्त भव्य जयंती उत्सवाचे आयोजन ससाणेनगर/सिद्धार्थनगरच्या वतीने करण्यात आले आहे. बुधवार, ३१ जुलै रोजी ११:४५ वाजता अभिवादन आणि फटाके आतिषबाजीने कार्यक्रमाची सुरुवात होईल.

गुरुवार, दिनांक १ ऑगस्ट रोजी सकाळी ९:०० वाजता मान्यवरांच्या हस्ते अभिवादन व ध्वजारोहण करण्यात येईल. त्यानंतर सकाळी १०:०० वाजता श्रीगोंदा शहरात उत्कृष्ट मनमोहक झांजपथक व लेझिम पथकासह मिरवणूक निघणार आहे. दुपारी १:०० वाजता स्नेहभोजनाचा आस्वाद सर्वांनी घ्यावा असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

सायंकाळी ४:०० वाजता फुले/शाहू/आंबेडकर विचार मंचचे अध्यक्ष अँड संभाजी आप्पा बोरुडे यांचे व्याख्यान होणार आहे. शालेय मुलांना वह्या, पुस्तके वाटप करून सामाजिक शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवरांचा सन्मान पत्र देऊन सन्मान करण्यात येणार आहे. तसेच सायंकाळी ‘लेझर शो’ चे आयोजन करण्यात आले आहे. स्मारकात वृक्षारोपणही करण्यात येणार आहे.

शुक्रवार, दिनांक २ ऑगस्ट रोजी महाराष्ट्राच्या सुप्रसिद्ध गायिका सौ. गायत्री शेलार यांच्या ‘पिचली माझी बांगडी’, ‘आझाद केलं तुला’, ‘डॉ. अण्णाभाऊ साठे’, व ‘लहुजी समाजप्रबोधनपर गीतांचा स्वरगंध’ कार्यक्रम साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे चौक येथे सायंकाळी ७:०० वाजता होणार आहे.

या कार्यक्रमाचे आयोजन “साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे जयंती उत्सव समिती” ससाणेनगर/सिद्धार्थनगरचे अध्यक्ष मा.नगरसेवक अनिल ससाणे, उपाध्यक्ष शिवाआप्पा घोडके, सचिव संदीपभाऊ उमाप, नितीन ससाणे, सल्लागार किशोर दादा नेटके, खजिनदार लाला ससाणे, राजू ससाणे, गणेश ससाणे, प्रा.संदीप सर, सचिन पाटोळे, कुणाल शिरवाळे, तृषाल ससाणे, गोरख घोडके यांच्या वतीने करण्यात आले आहे. या कार्यक्रमासाठी श्रीगोंदा तालुका पंचक्रोशीतुन जास्तीत जास्त लोकं संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन समितीच्या वतीने करण्यात आले आहे.

स्रोत:(प्रसिद्धी पत्र)

जाहिरात..

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading