दिनांक ५ ऑगस्ट,नांदेड:
अघोषितांचा बुलंद आवाज प्रणित मुव्हमेंट फॉर टीचर्स राईट्स या संघटनेचे १५ ऑगस्ट रोजी संपूर्ण महाराष्ट्रात एकाच वेळी एकदिवसीय अन्नत्याग धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. याबाबतचे निवेदन संघटनेचे कार्याध्यक्ष प्रा. दादाराव नालंदे यांनी काल नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयात दिले.
अघोषित कॉलेजवर शासनाने जो अन्याय केला आहे. त्या अन्यायावर लक्ष वेधण्यासाठी हे आंदोलन करण्यात येणार आहे. असे प्रा. नालंदे यांनी निवेदनात म्हटले आहे. गेल्या २० वर्षापासून शिक्षकांना शासनाने एक रुपये सुद्धा पगार दिला नाही. अनेक शिक्षक पगाराच्या प्रतीक्षेत सेवानिवृत्त झाले. तरी, त्यांना पगार चालू झाला नाही. अनेक शिक्षकांनी आत्महत्या केल्या. शासनाने साधी याची दखल सुद्धा घेतली नाही.
या निवेदनात अघोषित कॉलेज घोषित करून त्यांना तात्काळ पगार चालू करावा, बिंदूनमावलीची धडक मोहिम रद्द करण्यात यावी, शिक्षकांना सेवा संरक्षण द्यावे, या प्रमुख मागण्या निवेदनातुन करण्यात आल्या आहेत.
यावेळी संघटनेचे (राज्य कार्याध्यक्ष) प्रा. दादाराव नालंदे (राज्य संघटक) प्रा. राहुल सोनवणे, (राज्य सचिव) प्रा. गोविंद वाघमारे (नाशिक विभाग प्रमुख) प्रा. नितिन झणझणे (राज्य निरीक्षक) प्रा. पांडुरंग भोपळे (राज्य प्रसिद्धी प्रमुख) प्रा. राम सोनवणे, प्रा. संजय घोरबांड आदी पदाधिकारी उपस्थित होते.
स्रोत:(नितीन झनझने,श्रीगोंदा यांनी प्रसिद्धीस दिलेली माहिती)
