श्रीगोंद्यातील हॉटेल कामगारासह साथीदाराला पिस्तुलासह अटक..!

दिनांक २ ऑक्टोबर २०२४, श्रीगोंदा/अहमदनगर:

देशी बनावटीची पिस्तुलं मध्य प्रदेशातून खरेदी करून विक्री करण्याच्या तयारीत असलेल्या एका हॉटेल कामगारासह त्याच्या साथीदाराला ग्रामीण पोलिसांनी अटक केली आहे. आरोपींकडून पाच पिस्तूल आणि चार काडतुसे जप्त करण्यात आली आहेत.

अटक करण्यात आलेल्यांची नावे अनिकेत विलास गव्हाणे (वय २०, राहणार गव्हाणवाडी, ता. श्रीगोंदा, जि. अहमदनगर) आणि मंगेश दादाभाऊ खुपटे (वय २०, राहणार जवळा, ता. पारनेर) अशी आहेत. शिरुर बाह्यवळण मार्गावर एका हॉटेलजवळ आरोपी थांबले असताना पोलिसांनी त्यांना पकडले.

गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांच्या तपास पथकाने सापळा रचून दोघांना अटक केली. झडती घेतल्यावर त्यांच्या जवळून पाच पिस्तूल आणि चार काडतुसे जप्त करण्यात आली. आरोपी गव्हाणे हा हॉटेलमध्ये काम करत असताना एका चादर विक्रेत्याच्या ओळखीने हा गुन्हेगारी प्रवास सुरू झाला असल्याचं तपासात समोर आलं आहे. चादर विक्रेत्याने मध्य प्रदेशातील सेंधवा येथून पिस्तुलं खरेदी करून त्यांची जादा दराने विक्री केल्यास मोठा नफा कमवता येईल, असं गव्हाणेला सांगितलं होतं.

गव्हाणेने एक महिन्यापूर्वी पिस्तूल खरेदी केल्याची माहिती मिळताच पोलिसांनी कारवाई केली. या प्रकरणाचा तपास पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, अतिरिक्त अधीक्षक रमेश चोपडे, उपविभागीय अधिकारी प्रशांत ढोले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संदेश केंजळे, सहायक निरीक्षक हनुमंत गिरी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी पार पाडला.

स्त्रोत:(ऑनलाईन वृत्त)

जाहिरात..

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading