दिनांक २ ऑक्टोबर २०२४, श्रीगोंदा:
आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षाच्या ६७व्या वर्धापन दिनानिमित्त श्रीगोंदा येथे पक्षाची आढावा बैठक संपन्न झाली. ही बैठक शासकीय विश्रामगृह श्रीगोंदे येथे आयोजित करण्यात आली होती, ज्यात तालुक्यातील विविध पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी सहभाग नोंदवला.
३ ऑक्टोबर रोजी सातारा येथे होणाऱ्या आर पी आय (आठवले) पक्षाच्या वर्धापन दिन सोहळ्यास श्रीगोंदा तालुक्यातून मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित राहणार असल्याची माहिती तालुकाध्यक्ष राजाभाऊ जगताप यांनी दिली. या बैठकीत आर पी आय पक्षाचे जेष्ठ नेते जिवाजी घोडके, तालुका संघटक आनंद शिंदे, तालुका सचिव राजू काळेवाघ, तालुका सरचिटणीस भाऊसाहेब घोडके, युवक तालुकाध्यक्ष जॉन घोडके, शहराध्यक्ष चेतन ससाणे आणि इतर अनेक पदाधिकारी उपस्थित होते.
राजाभाऊ जगताप यांनी लोकसभा निवडणुकीत शिर्डीच्या जागेवरून झालेल्या वादाचा संदर्भ देत सांगितले की, या वादामुळे महाराष्ट्रातील आर पी आय कार्यकर्ते आणि समाज बांधव महायुतीवर नाराज झाले होते. त्याचाच परिणाम नगर जिल्ह्यातील उत्तर-दक्षिण मतदारसंघासह संपूर्ण राज्यात दिसून आला. त्यांनी पुढे सांगितले की, आर पी आयने आता नगर जिल्ह्यातील श्रीरामपूर राखीव मतदारसंघाची मागणी केली आहे. या मागणीला महायुतीतील घटक पक्षांनी मान्यता द्यावी आणि ती जागा आर पी आय साठी राखून ठेवावी, असे त्यांनी ठामपणे मांडले.
जगताप यांनी महायुतीसाठी आर पी आय कार्यकर्त्यांनी नेहमीच प्रामाणिकपणे काम केले असून, त्यांना प्रत्येक ठिकाणी डावलले जात असल्याची खंत व्यक्त केली. आर पी आय कार्यकर्ते प्रसिद्धीच्या मागे नसून त्यांच्या कामाने पुरोगामी चळवळी सह सामाजिक कामात त्यांचे वर्चस्व सिद्ध केले आहे, असेही त्यांनी नमूद केले.
यावेळी उपस्थित कार्यकर्त्यांनी आगामी विधानसभा निवडणुकीसाठीही पक्षाचे धोरण आणि तयारीवर चर्चा केली.
या बैठकीला स्वप्निल घोडके, ऋतिक जाधव, पप्पू जगताप, साजन घोडके, शेखर घोडके, किरण शिंदे, शशी घोडके, तुषार जगताप, बंडूभाऊ घोडके, राम घोडके, सचिन घोडके, दादा जगताप, योगेश घोडके, भैया कांबळे, शोएब शेख, अभिषेक तळेकर यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

स्त्रोत:(प्रसिध्दी पत्र)




