दिनांक १० ऑक्टोबर २०२४, श्रीगोंदा:
तालुक्यातील आढळगाव येथील रहिवासी राहुल संजय छत्तीसे यांची बहुजन मुक्ती पार्टीच्या श्रीगोंदा – नगर विधानसभा अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. बहुजन मुक्ती पार्टीचे (अ.नगर जिल्हाध्यक्ष) मा. शिवाजी भोसले व ॲड.प्रकाश लोंढे (जिल्हा महासचिव) यांनी त्यांना नियुक्ती पत्र सुपूर्द केले.
राहुल छत्तीसे यांची ही नियुक्ती एक वर्ष कालावधीसाठी करण्यात आली असून, पक्षाच्या उद्दिष्टांची पूर्तता करण्यासाठी त्यांच्याकडून अपेक्षा व्यक्त करण्यात आल्या आहेत. बहुजन मुक्ती पार्टीचा उद्देश समता, स्वतंत्रता आणि बंधुता प्रस्थापित करण्याचा आहे, आणि या दिशेने पक्ष संघटनेला आणखी मजबूती देण्यासाठी राहुल छत्तीसे यांनी पुढाकार घ्यावा अशी अपेक्षा पक्षाकडून आहे.
पक्षाचे ध्येय धोरण लक्षात घेऊन, जिल्ह्यातील प्रत्येक गाव, वाड्या-वस्त्यांमध्ये पक्षाचे संघटन मजबूत करण्यासाठी राहुल छत्तीसे यांनी प्रभावी कार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. पक्षाच्या वाढीसाठी आणि संघटनेला बळकटी देण्यासाठी राहुल छत्तीसे यांची कारकीर्द निर्णायक ठरणार आहे. त्यांच्या पुढील कामगिरीच्या आधारावर पक्षाकडून पुढील जबाबदाऱ्या देण्याचे संकेत देण्यात आले आहेत.
राहुल छत्तीसे यांनी या निवडीबद्दल कृतज्ञता व्यक्त करताना सांगितले की, “माझ्यावर पक्षाने जो विश्वास दाखवला आहे, त्यासाठी मी पक्षाच्या ध्येयांच्या पूर्ततेसाठी आणि बहुजन समाजाच्या प्रगतीसाठी पूर्ण शक्तीनिशी कार्यरत राहीन. प्रत्येक स्तरावर पक्षाचे संघटन मजबूत करण्याचा माझा प्रयत्न असेल.”
बहुजन मुक्ती पार्टीच्या या नव्या नेतृत्वामुळे श्रीगोंदा आणि अ.नगर परिसरात पक्षाच्या कार्याला नवीन ऊर्जा मिळणार असून, स्थानिक पातळीवर पक्षाचे संघटन विस्तारण्याची आणि सामाजिक न्यायासाठी प्रयत्नशील राहण्याची आशा व्यक्त केली जात आहे.
राहुल छत्तीसे यांच्या निवडीमुळे श्रीगोंदा तालुक्यात व परिसरात त्यांचे अभिनंदन करण्यात येत असून, पुढील कार्यासाठी शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

स्त्रोत:(नियुक्ती पत्र)



