दिनांक ३० एप्रिल, श्रीगोंदा:
छत्रपती संभाजी महाराज सेवा समिती मार्फत शंभूराजे बलिदान भूमी शौर्यपीठ तुळापुर येथे दीपोत्सव, राज्याभिषेक सोहळा, बलिदान दिन असे वेगवेगळे कार्यक्रम वर्षभर राबवून शिव शंभूचे विचार आणि तुळापुर च नाव महाराष्ट्रात नव्हे तर पूर्ण भारतात पसरवण्याचे कार्य करत आहेत.
देशात महामारीच संकट आल्या कारणाने यावेळी बलिदान दिवस हा कार्यक्रम रद्द करण्यात आला. परिस्तिथी अशीच राहिली तर,शंभू जयांतीचा कार्यक्रम सुधा रद्द होईल.याच पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजी महाराज सेवा समिती मार्फत शिव शंभू भक्तांसाठी फेसबुक वर समितीच्या अधिकृत पेज वर रोज सायंकाळी ७ वाजता वेगवेगळे शिव शंभुव्याख्याते , प्रबोधनकार यांच्यामार्फत शिव शंभू विचारांचा जागर सुरू केला आहे.
बरेच दिवस लॉकडाउन असल्यामुळे लोकामध्ये चीड,संताप असंतोष निर्माण झाला आहे.अशा परिस्तिथी मध्ये शिव शंभूच्या विचारांचा जागर हा नक्कीच प्रेरणादायी ठरत आहे आणि लोकांमधे नवचैतन्य निर्माण करत आहे. आतापर्यंत ह.भ. प. शिवलीला ताई पाटील विषय छत्रपती शासन, शंभूव्याख्याते राकेशदादा पिंजण विषय शभूचारित्र, शिवशाहीर संतोषजी साळुंके विषय छत्रपतींचा दरारा, शिव व्याख्याते खंडूजी डोईफोडे विषय छत्रपती शिवराय आणि आजचा महाराष्ट्र तसेच स्वराज्यारक्षक संभाजी फेम महाराणी यसूबाई यांची भूमिका साकारणाऱ्या प्राजक्ता ताई गायकवाड, श्री सखी राज्ञी जयती अशा नामवंत प्रतिष्ठावंत व्यक्तीची लाइव्ह प्रबोधन राबवले आहेत.पुढेही १४ मे म्हणजेच शंभूराजे जयंती पर्यंत रोज सायंकाळी ७ वाजता वेगवेगळे विचारवंत लाइव्ह आणून शिव विचारांचा जागर सुरूच राहणार आहे. आपणही समितीच्या अधिकृत पेज वर भेट द्या.जास्तीत जास्त मावळ्यांना या प्रबोधन पर्वामध्ये सहभागी होता याव म्हणून,समितीचे सर्व शिलेदार दिवसरात्र सोशल मीडिया फेसबुक, WhatsApp च्या माध्यमातून लाखो लोकांपर्यंत माहिती पोहोचवण्याचे काम करत आहेत. शिव शंभूचे विचार लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी तसेच तुळापुरच्या भूमीचा इतिहास देशभर पसरविण्यासाठी सेवा समिती नेहमी तत्पर असते. अशी माहिती सेवा समितीचे श्रीगोंदा तालुकाध्यक्ष प्रेमराज मोहिते व पदाधिकाऱ्यांनी दिली आहे.
