परिक्रमा’औषधनिर्माण शास्त्र महाविद्यालयात लाईव्ह वेबिनारचे आयोजन.

दिनांक १३ जून (काष्टी,श्रीगोंदा):

श्रीगोंदा तालुक्यातील काष्टी येथील बबनराव पाचपुते विचारधारा ट्रस्टच्या ‘परिक्रमा’ शैक्षणिक संकुलातील औषधनिर्माण शास्त्र महाविद्यालयात, “हर्बल इम्यून बूस्टर कोविड – १९” या विषयावर एक दिवसीय लाईव्ह वेबिनारचे दि.७ जून २०२० रोजी आयोजन करण्यात आले. अशी माहिती प्राचार्य डॉ. सुनील निर्मळ यांनी दिली.

कोविड – १९ च्या प्रादुर्भावाचा सामना करता यावा यासाठी औषधी वनस्पतींचा वापर करून रोगप्रतिकार शक्ती कशी वाढवता येईल, याविषयी डॉ. पुनीत रच्च (मॅनेजर, मेडिको मार्केटिंग गुजरात) यांनी मार्गदर्शन केले. या वेबिनारसाठी महाराष्ट्रातील विविध महाविद्यालयातील विद्यार्थी, शिक्षक व इंडस्ट्रीमधील रिसर्च सायंटिस्ट असे एकूण ४८० प्रतिनिधी सहभागी झाले होते. प्रा. वैशाली फाळके यांनी कार्यक्रमाचे संयोजन केले व प्रा. जयदीप पवार यांनी तांत्रिक मदत केली.

विद्यार्थ्यांच्या ज्ञानात भर पाडण्यासाठी परिक्रमा संस्था सतत प्रयनशील असते व असे कार्यक्रम अधिकाधिक आयोजित करू, अशी माहिती संस्थेचे संचालक श्री. प्रतापसिंह पाचपुते यांनी दिली.

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading