परिक्रमा’ औषधनिर्माण शास्त्र महाविद्यालयात लाईव्ह वेबिनारचे आयोजन

दिनांक २२ मे,काष्टी, श्रीगोंदा:

श्रीगोंदा तालुक्यातील काष्टी येथील मा. श्री. बबनराव पाचपुते विचारधारा ट्रस्टच्या ‘परिक्रमा’ शैक्षणिक संकुलातील औषधनिर्माण शास्त्र महाविद्यालयात, इंनजिनीअस हेल्थकेअर क्लिनिकल रिसर्च इन्स्टिट्यूट, पुणे यांच्या सहयोगाने ‘करिअर अपॉर्च्युनिटीज ईन क्लिनिकल रिसर्च अँड मेडिकल रायटींग’ या विषयावर एक दिवसीय लाईव्ह वेबिनारचे दि. १७ मे २०२० रोजी आयोजन करण्यात आले.अशी माहिती प्राचार्य डॉ.सुनील निर्मळ यांनी दिली.

क्लिनिकल रिसर्च व मेडिकल रायटिंग विभागात उपलब्ध असलेल्या संधी व ते प्राप्त करण्यासाठी करावी लागणारी पूर्वतयारी याविषयी सौं. पर्णवी रावल व श्री. भरत क्षीरसागर यांनी मार्गदर्शन केले. या वेबिनारसाठी महाराष्ट्रातील विविध महाविद्यालयातील विद्यार्थी, शिक्षक व इंडस्ट्रीमधील रिसर्च सायंटिस्ट असे ११०० प्रतिनिधी सहभागी झाले होते. डॉ. निलेश जाधव यांनी कार्यक्रमाचे संयोजन केले व प्रा. जयदीप पवार यांनी तांत्रिक मदत केली.

विद्यार्थ्यांच्या ज्ञानात भर पाडण्यासाठी परिक्रमा संस्था सतत प्रयनशील असते व असे कार्यक्रम अधिकाधिक आयोजित करू,अशी माहिती संस्थेचे संचालक श्री. प्रतापसिंह पाचपुते यांनी दिली.

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading