दिनांक २१ मे,श्रीगोंदा :
महाराष्ट्र युवक काँग्रेसच्या वतीने भारतरत्न माजी प्रधानमंत्री राजीव गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त गरीब कुटुंबांना एक दिवसासाठी “न्याय” योजनेचा प्रतिकात्मक अनुभव देण्यासाठी सुमारे ५० गरजूवंत कुटुंबाना प्रत्येकी २०० रुपये अर्थसाहाय्य करण्यात आले.
२०१९ च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाच्या जाहीरनाम्यात १,४४,००० रुपयांपेक्षा कमी उत्पन्न असलेल्या कुटुंबासाठी दररोज २०० रुपये प्रमाणे महिन्याला ६,००० रुपये मदत देण्याचे वचन दिले होते. परंतु काँग्रेसचा पराभव झाल्याने ही योजना प्रत्यक्षात आली नाही. मात्र, महाराष्ट्र युवक काँग्रेसने केंद्र सरकारकडे करोना महामारी काळात गरीब कुटुंबासाठी पुढील सहा महिने तरी अशी योजना राबवण्याची मागणी केली आहे.
त्याचाच भाग म्हणून,युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजीत तांबे यांच्या प्रेरणेतून या योजनेचा गरजवंताच्या जीवनात काय फरक पडू शकतो, याचा एक दिवसाचा अनुभव देण्यासाठी श्रीगोंदा तालुका युवक काँग्रेसतर्फे ५० गरजू व्यक्तींना प्रती २०० रुपये प्रमाणे पैशाचे वाटप करण्यात आले. यावेळी,नगरसेवक समीर बोरा, जिल्हा युवक कॉंग्रेस नेते स्मितलभैय्या वाबळे उपस्थित होते.
