वाढदिवसाचा अनाठायी खर्च टाळून रक्तदान शिबीराचे आयोजन..

दिनांक २५ सप्टेंबर,श्रीगोंदा:

कोरोनाचा वाढता प्रदुर्भाव पाहता मयुर पोपटदादा बनसुडे यांनी त्यांचा २१वा वाढदिवस अनाठाई खर्च टाळत रक्तदान शिबिर आयोजित करून साजरा केला. या उपक्रमाबद्दल मयूरचे सामाजिक, राजकीय व मित्र परिवाराकडून हार्दिक अभिनंदन करण्यात आले.

संकटकाळा मध्ये होणारी रक्ताची टंचाई लक्षात घेत, सामाजिक भावनेतून रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले. यावेळी जनकल्याण रक्तपेढी अहमदनगर यांचे माध्यमातून रक्त संकलन केले गेले. या उपक्रमाचे सर्व स्तरातून स्वागत करीत, मयूर यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्या. या निमित्ताने ३५ रक्तदात्यांनी रक्तदान केले आहे.

कोरोनाचा वाढता प्रदुर्भाव पाहता मयुर पोपटदादा बनसुडे यांनी वाढदिवसानिमित्त बाकी सर्व खर्च टाळून रक्तदान शिबिर आयोजित केल्याने, त्यांचे अनेकांनी अभिनंदन केले आहे.

यावेळी श्रीगोंदा नगरपरिषदेच्या नागराध्यक्षा शुभांगी (ताई) पोटे तसेच (नगरसेवक) सुधीर भाऊ खेडकर, सतिश मखरे, सुनिल वाळके, संतोष (तात्या) खेतमाळीस, विकास बोरुडे, पोपटराव बनसुडे, पंकज बनसुडे व राष्ट्रवादी काँग्रेस युवा पदाधिकाऱ्यांच्या उपस्तिथीत रक्तदान शिबिर मोठ्या उत्साहात संपन्न झाले.

स्रोत:(पंकज बनसुडे यांनी प्रसिद्धीस दिलेली माहिती)

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading