दिनांक २५ सप्टेंबर,श्रीगोंदा:
कुकडीच्या व विसापूरच्या ओव्हरफ्लो पाण्यातून साठवण बंधारे व शेततळी शेतकऱ्यांनी भरून घ्यावीत, असे आवाहन आमदार बबनराव पाचपुते यांनी केले आहे.
कुकडी धरणक्षेत्रात चांगला पाऊस झाल्यामुळे कुकडीचे धरणे ओव्हरफ्लो झाली आहेत. हे पाणी नदीत सोडण्यात आले असून, काही पाणी विसापूर धरणात सोडल्यामुळे विसापूर तलाव हि ओव्हरफ्लो झाला आहे. त्यामुळे विसापूर खालील शेतकऱ्यांनी साठवण बंधारे व शेततळी भरून घ्यावीत. तसेच, विसापूर मधील ओव्हरफ्लोचे पाणी कुकडी जुन्या १३२ लिंक कॅनालमधून घेऊन त्याखालील ही सर्व छोटे मोठे साठवण बंधारे व शेततळी शेतक-यांनी भरून घ्यावेत. असे आवाहन आमदार पाचपुते यांनी केले आहे.
या पाण्याचा भविष्यात उपयोग होईल: पाचपुते.
सध्या धरणे भरून नदीत पाणी चालू आहे. पण याच पाण्यातून जर कॅनॉल द्वारे शेततळी साठवण बंधारे भरून घेतले. तर, भविष्यात या पाण्याचा शेतकऱ्यांना नक्कीच उपयोग होणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी कुकडीच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधून पाणी घ्यावे. असेही आमदार बबनराव पाचपुते म्हणाले आहेत.
स्रोत:(अनिल वाळके यांनी प्रसिद्धीस दिलेली माहिती)
