दिनांक १५ जुलै, काष्टी/श्रीगोंदा:
श्रीगोंदा तालुक्यातील काष्टी येथील मा. ना. श्री. बबनराव पाचपुते विचारधारा ट्रस्टच्या ‘परिक्रमा’ शैक्षणिक संकुलातील डी. फार्म. व बी. फार्म. औषधनिर्माण शास्त्र महाविद्यालयात, सॅफ्रॉन होलिस्टिक हेल्थ केअर प्रायव्हेट लिमिटेड कंपनीशी केलेल्या सामंजस्य करार अंतर्गत’ कोविड-१९ मध्ये सॅनिटायझर चा वापर’ या विषयावर मेजर ऋषिकेश गाडीलकर यांनी ऑनलाईन व्याख्यान दिले. यात सॅनिटायझर निर्मिती, कॉलीटी कंट्रोल, लॅबेलिंग ई. बद्दल माहिती दिली. कंपनीशी केलेल्या सामंजस्य करार अंतर्गत परिक्रमा फार्मसी महाविद्यालय विद्यार्थ्यांसाठी नियमित इंडस्ट्रियल व्हिसिटस, गेस्ट लेक्टर इ. आयोजित करत असल्याची माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुनील निर्मळ व प्राचार्य अमोल खेडकर यांनी दिली. प्रा. रमेश शिंदे व प्रा. जयदीप पवार यांनी कार्यक्रमाचे संयोजन केले.
विद्यार्थ्यांच्या ज्ञानात भर पाडण्यासाठी परिक्रमा संस्था सतत प्रयनशील असते व असे कार्यक्रम अधिकाधिक आयोजित करू अशी माहिती संस्थेचे संचालक श्री. प्रतापसिंह पाचपुते यांनी दिली.
ह्या स्तुत्य उपक्रमाचे, अध्यक्षा डॉ. सौ. प्रतिभाताई पाचपुते, सचिव श्री. विक्रमसिंह पाचपुते, संकुल संचालक डॉ. विजय पाटील व मुख्य प्रशासकीय अधिकारी डॉ. अनिल पुंड यांनी अभिनंदन केले.
स्रोत: (परिक्रमा महाविद्यालय, काष्टी यांनी दिलेली माहिती)
