कागदी लिंबोणीचा बहार..

श्रीगोंदा तालुका लिंबोणीच्या बागांचे आगार आहे लिंबोणीत अनेक सुधारीत वाण आले आहे. अशा परिस्थितीत श्रीगोंदा येथील शेतकरी मच्छिंद्र तात्याबा खेतमाळीस या शेतकऱ्याने स्व : ता चुनखडी मातीचे प्रमाण असलेल्या दोन एकर क्षेत्रात गावरान कागदी लिंबाची लागवड केली. आणि जादा लाईफ असलेले गावरान कागदी लिंबोणीची रोपवाटीका तयार केली आहे. लिंबोणीच्या या रोपातून खेतमाळीस यांच्या संसारात आर्थिक समृध्दीचा रंग भरला आहे.

मच्छिंद्र यांना वडिलोपार्जित १० – १२ एकर जमीन. डॉ. साहेबराव, मारुती हे दोन भाऊ एकत्रीत कुंटूब पध्दतीने प्रगतीला दिशा मिळाली मच्छिंद्र हे पदवीधर झाले. मुक्ता हिच्याशी विवाह झाला त्यांना प्राची व ऋतुजा दोन मुली प्राची अभियंता म्हणून पदवी संपादन करीत आहे.

श्रीगोंदा तालुका पूर्वी पासून लिंबोणीच्या बागात अग्रेसर आहे. श्रीगोंद्यातील लिंबास देशातील सर्व भागात चांगली मागणी असते. श्रीगोंद्याचे लिंबू जगाच्या कानाकोपऱ्यात पोहचले आहे. त्यामुळे आंबट लिंबाने हजारो शेतकऱ्यांच्या जीवनात गोडवा निर्माण केला आहे. लिंबातून अनेक मुलांना व्यवसायाची दिशा मिळाली आहे.

लिंबोणीच्या बागा निचऱ्याच्या लाल काळ्या मातीत यशस्वी होतात पण चुणखडीचे प्रमाण असलेल्या मातीत या लिंबोणी बाग सहजासहजी यशस्वी होत नाहीत हा अनुभव आहे. अशा परिस्थितीत शेतीतज्ञ रमेश हिरवे यांच्या मार्गदर्शनाखाली मांडवगण रोडवरील मच्छिंद्र खेतमाळीस यांनी चुणखडीचे प्रमाण असलेल्या सुमारे पावणे दोन एकर क्षेत्रात गावरान कागदी लिंबाची लागवड करण्याचा प्रयोग केला या झाडांना सुक्ष्म अन्न द्रव्य खताचा प्रमाणात डोस आणि किटक नाशकांच्या फवारण्या नियमीत केल्या आणि लिंबोणीची बाग बहरली दोन वर्षात लिंबोणीची बाग चालविली आता बागेची पुर्ण वाढ झाली आहे. त्या अगोदर खेतमाळीस यांनी सहा लाखाचे उत्पादन बागेतून घेतले असुन या बागेतील लिंबातील बियापासून लिंबोणीची रोपे तयार केली आहे. त्यामधून सुमारे तीन लाखाचे उत्पन्न मिळाले आहे.

सध्या लिंबोणीत साईसरबती बालाजी सारखे सुधारीत वाण आले. त्यामुळे कागदी लिंबूची लागवड कमी होत आहे. अशा परिस्थितीत मच्छिंद्र खेतमाळीस यांनी कागदी लिंबाचा वाण शेतकऱ्यांना पुरविण्यासाठी चांगले काम हाती घेतले आहे यामुळे गावरान कागदी लिंबाचे संवर्धन होण्यास मोठी मदत होणार आहे.

संदेश

पाणी टंचाई मुळे शेतीत अनेक आडचणी उभ्या राहिल्या आहेत. जादा पैसे देणाऱ्या डाळिंब पीकाकडे शेतकऱ्यांचा कल वाढला आहे तेल्या रोगाचे सावट आहे त्यामुळे शेतकऱ्यांना पुन्हा लिंबाच्या शेती शिवाय सक्षम पर्याय राहिलेला नाही. रमेश हिरवे यांच्या मार्गदर्शनाखाली आपण चुनखडीच्या क्षेत्रात गावरान कागदी लिंबोणीची लागवड केली. झाड आता सेट झाली. आहेत यापुढे उत्पन्न वाढणार आहे. तरूण मुलांनी इतर पिक पीक घेताना लिंबोणीस क्षेत्र राखून ठेवणे आवश्यक आहे. भविष्यात लिंबोणी शेतकऱ्यांना वरदान ठरणार हे निश्चित आहे.

स्व.मच्छिंद्र खेतमाळीस,श्रीगोंदा.
स्रोत:(अग्नीपंख फौंडेशन)

प्रस्तुत माहिती पुस्तक प्रकाशनाच्या वेळेची असून, सदरील शेतकरी मच्छिंद्र खेतमाळीस हे मागील काही दिवसांपूर्वी मयत झाले आहेत.

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading