पंकज गणवीर यांचा पत्रकारिता क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल सन्मान.

पंकज गणवीर यांचा पत्रकारिता क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल सन्मान ..

दिनांक २४ फेब्रुवारी, (येळपणे,पिसोरे,श्रीगोंदा):
श्रीगोंदा तालुक्यातील येळपणे- पिसोरे,पोलीसवाडी शिवजयंती उत्सव समितीतर्फ पत्रकारिता क्षेत्रात उल्लेखनिय कार्याबद्दल पंकज गणवीर यांना स्मृती चिन्ह, सन्मान पत्र शाल श्रीफळ देऊन सन्मानित करण्यात आले.
ग्रामीण भागातील वीज , पाणी, शेतकऱ्यांचे मूलभूत प्रश्न व रस्त्यांच्या बाबतीतील दुरवस्थेबाबतचे प्रश्न, शैक्षणिक ,सामाजिक, अध्यात्मिक ,यावर पत्रकार पंकज गणवीर यांनी सतत परखडपणे केलेले लिखाण आणि त्यांच्या या सडेतोड लेखणी माध्यमातून सर्वसामान्य नागरिकांना मिळालेला न्याय व त्या प्रश्नांची झालेली तत्पर सोडवणूक, तसेच त्यांनी वेळोवेळी राजकीयदृष्ट्या केलेले लिखाण आदी गोष्टींमुळे यांच्या पत्रकारितेच्या क्षेत्रातील उल्लेखनीय कामाची दखल घेत पत्रकारिता पुरस्कारानी सन्मानित करण्यात आले. यावेळी रामदास कोळपे यांनाही सन्मानित करण्यात आले.
या सर्वांचे उद्योजक शंकर पाडळे,अतुल लोखंडे,महेन्द्र वाखारे,मोहनराव आढाव,सचिन कातोरे,सचिन चौधरी, विश्वास गुंजाळ,अशोक ईश्वरे,डॉ.संतोष साबळे,उल्हास कौठाळे,बलभिम आढाव,दादा ओहोळ,संजय साळवे, संपत भागवत,राजेंद्र पोटे,गवराम आढाव,संजय ठाणगे,पांडूरंग बनकर,आदिसह परिसरातुन अभिनंदन होत आहे ..

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading