शिवराज्य आल्यास पुन्हा शिवराय जन्माला येतील – प्रा.सचीन झगडे.
01 mins
शिवराज्य आल्यास पुन्हा शिवराय जन्माला येतील – प्रा.सचीन झगडे.
दिनांक २४ फेब्रुवारी, शिरसगाव बोडखा,श्रीगोंदा:
ज्या काळी जनता मुघलांच्या त्रासाने त्रासून गेली होती. त्यावेळी,अठरापगड जातीतील गुणवान मावळ्यांना बरोबर घेत,जिजाऊंच्या आशिर्वादाने शिवरायांनी स्वराज्य निर्माण केले.आज पुन्हा एकदा या स्वराज्याची महाराष्ट्राला गरज आहे.असे शिवराज्य आल्यास शिवराय पुन्हा जन्माला येतील.असे प्रतिपादन शिवव्याख्यानकार प्रा.सचीन झगडे यांनी शिरसगाव बोडखा येथील जि.प.प्राथमिक देशमुखवस्ती आदर्श शाळेत छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती ‘ शिवदिन ‘ म्हणून साजरी करण्यात आली त्यावेळी केले.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रंगनाथ देशमुख होते. पुढे बोलताना त्यांनी सांगितले की,शिवरायांमधील धाडस,मुत्सदेगिरी,शौर्य,पराक्रम,जनतेवरील अपार श्रद्वा हे गुण आपण अंगीकारले पाहिजेत.
यावेळी शाळा विकासासाठी योगदान देणाऱ्या नंदकुमार गाडेकर,संभाजीराव सोमवंशी,धोंडिबा मासाळ यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. मुख्याध्यापक रामदास ठाकर,मा.सरपंच तेजमल धारकर व विद्यार्थिनींनी आपले मनोगत व्यक्त केले.तसेच किल्ले बनवा स्पर्धेतील गुणवंताना पारितोषिके देऊन सन्मानित करण्यात आले.
कार्यक्रम यशस्वितेसाठी(उपसरपंच)प्रकाश वाबळे, (शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष)ज्ञानेश्वर गुणवरे, (उपाध्यक्ष)केशवराव वाबळे,(मा.सरपंच)तेजमल धारकर,दिलावर सय्यद,शंकर सोमवंशी,रमेशराव गायकवाड,संकेत नागवडे,शुभम गायकवाड,मल्हारी कळमकर,विठ्ठल मासाळ,विठ्ठल गलांडे यांनी विशेष परिश्रम घेतले.सूत्रसंचालन संतोष पठारे यांनी तर आभार विशाल सोमवंशी यांनी मानले. कार्यक्रमास माता भगिनी व ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते.