दिनांक ४ एप्रिल,श्रीगोंदा :
सध्या देशात सर्वत्र कोरोना ने हाहाकार माजवला आहे.कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी तसेच गरीबांच्या मदतीसाठी जिल्हा प्रशासन,राजकीय नेते,सर्व यंत्रणा एकवटल्या असतांना श्रीगोंद्यातील आजी ,माजी आमदार, कारखादार, जि.प. सदस्य, एखादा दुसरा वार्डातला नगरसेवक सोडला तर, बाकीचे नगरसेवक कुढे गायब झाले आहेत? ते जनतेच्या मदतिसाठी पुढाकार घेणार आहेत की नाहीत ? असा सवाल राजेश डांगे यांनी उपस्थित केला आहे.
पुढे डांगे नमूद केले आहे की,आपण रोज टीव्ही,सोशल मिडीयावर पाहतो, जिल्ह्यात अनेक ठिकाणी आजी,माजी आमदार,जिल्हा परिषद सदस्य हे गरीबांच्या मदतीला धावुन येत असुन, तेवंचित घटकांना, जेवन, अत्यावक्षक व जीवनावश्यक वस्तु देत आहेत. परंतू , श्रीगोंद्याचे राजकारणी आता कोठे गायब झाले ? ते काही कळेणा ! !
निवडणुकींच्या काळात हेच राजकारणी स्वतःची पोळी भाजुन घेण्याकरीता,सर्वसामान्यांचा वापर करुन घेतात आणि आता जनतेला त्यांची गरज असतांना मदतीसाठी पुढे येईनात.कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासन आणि सर्व यंत्रणा एकवटल्या असतांना,अनेक सामाजिक संघटना आणि उद्योग आस्थापनांनीही मदतीसाठी हात पुढे केला आहे.
श्रीगोंदा तालुक्यात मात्र,हे चित्र उलट व चीड आणनारे आहे.आज जनतेला गरज असतांना, बाहेर पडून सामान्यांच्या व्यथा जाणून घेण्याऐवजी,घरात हार्मोनियम व तबला वाजवत दिवस काढणारे नगरसेवक सामाजिक माध्यमातून चांगलेच चर्चेत येत आहेत.वरील पैकी एखाद-दुसरा सोडला तर निवडणुकीच्या काळाज सर्वसामान्यांच्या जिवावर (मतांवर) मोठे झालेल्यांना आजच्या आपत्ती मध्ये जनतेचा विसर पडला आहे.ही अतीशय दु:खदायक गोष्ट असल्याचे डांगे यांनी विशेषतः नमूद केले आहे.
