दिनांक ४ एप्रिल,श्रीगोंदा:
श्रीगोंदा तालुक्यातील सर्व नागरिकांना स्थानिक प्रशासना मार्फत आवाहन करण्यात आले आहे की, आतापर्यंत नगर जिल्ह्यात कोरोना बधितांची संख्या वाढत आहे.जिल्ह्यातील काही तालुक्यात देखील कोरोना पॉसिटीव्ह रुग्ण आढळून आले आहेत .
श्रीगोंदा तालुक्यातील ६ व्यक्ती हे कोरोना पॉझीटीव्ह रुग्णांच्या संपर्कात आले असल्यामुळे, त्यांना आज दिनांक ४ एप्रिल रोजी अबुलन्सने सिव्हिल हॉस्पिटल अहमदनगर येथे तपासणीसाठी पाठविण्यात आले आहे .
कोरोना आता तालुक्याचा उंबरठ्यावर असल्याने खबरदारीचा उपाय म्हणून,श्रीगोंदा तालुका प्रशासना मार्फत दिनांक ५ एप्रिल २० ते दिनांक ७ एप्रिल २० असे ३ दिवस जनता करफू संपूर्ण तालुक्यात जाहीर करण्यात आला आहे.
या कालावधीत तालुक्यातील अत्यावश्यक सेवांमध्ये मेडिकल आणि हॉस्पिटल तसेच, खाजगी दवाखाने सुरू राहतील. इतर अत्यावश्यक सेवा किराणा ,भाजीपाला, दूध,गॅस हे घरपोच सेवा देणे सुरू राहील.
या कालावधीत कोणीही नागरिक हे अत्यावश्यक कारणाशिवाय घराबाहेर पडणार नाहीत. याची सर्वानी दक्षता घ्यावी.अन्यथा त्यांचेवर कडक कायदेशीर कारवाई करीत गुन्हे दाखल करण्यात येतील.असा इशारा प्रशासनामार्फत देण्यात आला आहे.सदरील सूचना श्रीगोंदयाचे तहसीलदार तथा तालुका कार्यकारी दंडाधिकारी महेंद्र माळी यांनी प्रसिद्धीस दिली आहे.
सर्वांनी याचे काटेकोर पालन करावे.कोणीही या तीन दिवसांच्या कालखंडात घराच्या बाहेर पडू नये . अन्यथा,कायदेशीर कारवाई ,करणार असल्याचे संकेत स्थानिक प्रशासनामार्फत देण्यात आले आहेत.
