दिनांक १८ फेब्रुवारी २०२४, श्रीगोंदा:
शहरासह तालुक्यात होणाऱ्या शिवाजी महाराजांच्या जयंती सोहळ्यानिमित्त कायदा सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी स्थानिक पोलीस व महसूल यंत्रणेमार्फत आयोजीत शांतता समितीची बैठक काल संपन्न झाली. यावेळी तहसिलदार क्षितिजा वाघमारे, पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर भोसले, पोलीस उप निरिक्षक समीर अभंग, गटविकास अधिकारी जगताप सर, पोलीस कर्मचारी सचिन गोरे, ॲड. सुमित बोरुडे, अरविंद कापसे(संभाजी ब्रिगेड), नाना शिंदे(संभाजी ब्रिगेड), दिपक मखरे, अक्षय अनभुले, पत्रकार विशाल चव्हाण, संतोष शिंदे (शिवसेना), निलेश कुरुमकर, जयराज गोरे (शिवसेना), सकल मराठा समाजाच्या भारती इंगवलें सह महिला व समाज बांधव बैठकीस उपस्थित होते.
या बैठकीत अरविंद कापसे व ॲड. सुमित बोरुडे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. कापसे यांनी शिव जयंती कार्यक्रमाची रूपरेषा नमूद केली. तर बोरुडे यांनी उद्भवणाऱ्या काही बाबी निदर्शनास आणून देत प्रशासनाला कारवाईची मागणी केली.
यावेळी पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर भोसले यांनी जयंतीसाठी चोख बंदोबस्त ठेवला जाणार असल्याचे सांगितले. महिलांच्या बाईक रॅलीत महिला कर्मचारी तैनात करण्यात येतील, DJ लावू नका, शहरात १०:०० ते ६:०० दरम्यान लाऊस्पिकर लावू नका, फ्लेक्स साठी परवानगी घ्या, लोकांना त्रास होणारं नाही याची काळजी घ्या, सामाजिक माध्यमांवरील अक्षेपहार्य मजकूर, स्टेटसवर तत्काळ कारवाई करण्यात येईल, आयोजकांनी कार्यक्रमाची रीतसर परवानगी घ्यावी, जेणेकरून नमूद ठिकाणी बंदोबस्त देण्यात येईल, सर्व महापुरुषांचे सन आनंदाने साजरे व्हावेत हि अपेक्षा आहे. असे त्यांनी उपस्थितांना सांगितले आहे.
पुढे तहसिलदार क्षितिजा वाघमारे यांनी सूचना केल्या. त्यांनी सांगितले की, सोसियल मीडियाचा जबाबदारिने वापर करावा, मजुकर टाकताना पथ्य पाळा, सामाजिक सलोखा अबाधित ठेवा, विशेषतः तरुण वर्गाने भान ठेवून सामाजिक माध्यमांचा वापर करा, DJ ची आवाजाची मर्यादा पाळावी लागेल, श्रीगोंद्याच्या पावन भूमीचे पावित्र्य राखावे, उस्ताह आणि विवेक यांचा समन्वय साधून जयंती साजरी करावी.. असे वाघमारे यांनी सांगितले आहे.
बैठकीत पत्रकार विशाल चव्हाण यांनी सूत्रसंचालन केले. तर, पोलीस उप निरिक्षक समीर अभंग यांनी कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी प्रशासन कटिबद्ध असल्याचे स्पष्ट करून उपस्थित अधिकारी, पदाधिकारी, समाज बांधव व ग्रामस्थांचे आभार मानलेत.
स्रोत:(शांतता समितीची बैठक)

