श्रीगोंद्यातील सायकल पटूंचे पंढरपुरात वृक्षारोपण..

दिनांक ८ जुलै २०२४,श्रीगोंदा/पंढरपुर:

येथील श्री विठ्ठल रुक्मिणी देवस्थान ट्रस्ट समितीच्या वेदांत भक्त निवास परिसरात श्रीगोंदा येथील शिवशंभु सायकल राईड असोसिएशनने वृक्षारोपण केले. “वृक्षवल्ली आम्ही सोयरे वनचरे” हा संत तुकाराम महाराजांचा संदेश दिला. शिवशंभुचे वारी प्रमुख गोपाळ डांगे यांच्या नेतृत्वाखालील श्रीगोंदा ते पंढरपूर अशी १७५ किमीची एक दिवशीय सायकल वारी काढली. यामध्ये राशीन, दौड, श्रीगोंदा येथील ४६ वारकरी सहभागी झाले होते.

रविवारी अखिल महाराष्ट्र पंढरपूर सायकल समितीचे तिसरे संमेलन झाले. या संमेलनात राज्यभरातून ३२ ग्रुपचे दोन हजार सायकल पटू सहभागी झाले. सुरुवातीला अहमदनगर येथील वारकरी सायकल पटू कानीफनाथ कोतकर यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. कानीफनाथ कोतकर यांच्या सायकलला शनिवारी संध्याकाळी टेंभुर्णी जवळ करकम येथे एका वाहनाने धडक दिल्याने कानीफनाथ कोतकर यांचा जागीच मृत्यू झाला होता. नगरचे १०० सायकल पटू आपली वारी अर्धवट सोडून नगरला परतले. या घटनेचे सावट संमेलनावर जाणवले.

रविवारी सकाळी दोन हजार पटूंनी पंढरपूर प्रदक्षिणा घातली. वेदान्त भक्त निवास समोर सायकल पटूंचे संमेलन झाले. समितीने सायकल पटूंचे आदरातिथ्य केले. संमेलनास सायकल वारकरी करून संमेलनाची शोभा वाढविणाऱ्या सायकल वारी प्रमुखांचा सत्कार करण्यात आला. यामध्ये श्रीगोंद्यातून शिवशंभुच्या अध्यक्ष विजया लंके व गोपाळ डांगे यांचा सत्कार केला. पण श्रीगोंद्याचे सेवानिवृत्त सैनीक नवनाथ खामकर यांनी सायकलला लावलेल्या तिरंगा झेंड्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले.

यावेळी गोपाळराव डांगे, नवनाथ खामकर, विजया लंके, मनीषा काकडे, गौरी कोहळे, सुरेश खामकर, भाऊसाहेब वाघ, सुभाष धुमाळ, पांडुरंग बिडगर, प्रशांत बंब, दिपक दुधे, सुरेश मराडे, संदीप वागजकर, लतिका वाबळे, अनिकेत वाबळे, अनंत शिंदे, दिपक साबळे, दत्ता हिरवे, भाऊसाहेब खेतमाळीस, प्रशांत एरंडे, संकेत गांजुरे, सविता शिंदे, रेखा डोंगरे, कावेरी गुरसलर, संदीप येडे, संजय येडे, अर्थव कोहळे, देवीदास खेतमाळीस, वैभव पोपट जाधव, अमोल दत्तात्रय झगडे, प्रितम प्रफुल शहा, लक्ष्मीकांत देविदास पाठक, संकेत मनोज बोरा, आनंद देविदास कदम, अनुराग दिलीप अच्छा उपस्थीत होते.

स्रोत:(प्रसिद्धी पत्र)

जाहिरात..

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading