पोलीस हवालदार संतोष फलके ७ हजार रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडले..

दिनांक २८ फेब्रुवारी २०२५,श्रीगोंदा (अहिल्यानगर):

तक्रारदार व त्यांच्या १३ नातेवाईकांविरुद्ध दाखल गुन्ह्याच्या तपासात मदत करण्यासाठी २० हजार रुपयांची लाच मागणाऱ्या श्रीगोंदा पोलीस ठाण्यातील पोलीस हवालदार संतोष फलके यांना ७ हजार रुपये स्वीकारताना रंगेहात पकडण्यात आले.

अहिल्यानगर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने २७ फेब्रुवारी रोजी सापळा रचून ही कारवाई केली. तक्रारदाराने दिलेल्या तक्रारीनंतर लाच मागणी पडताळणी करण्यात आली. तपासात मदतीसाठी प्रत्येकी ५०० प्रमाणे एकूण ७००० रुपये घेताना संतोष फलके यांना रंगेहात पकडण्यात आले.

याप्रकरणी श्रीगोंदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. नागरिकांनी शासकीय कर्मचाऱ्यांकडून लाचेची मागणी झाल्यास अँटी करप्शन ब्युरो, अहिल्यानगरशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

स्रोत:(प्रसिद्धी पत्र)

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading