शिक्षण
सर्व राजकुमारांचे पाटलीपुत्रच्या पाठशाळेत शिक्षण चालू होते . शाळा फारच . मोठी होती . त्या ठिकाणी अनेक प्रकारचे शिक्षण दिले जात होते .

अनेक दालने सोयीने सज्ज करण्यात आलेली होती. बंधू सुसीम , सुब्रह्मण्यम् , वित्ताशोक हे लेखन , काव्य , चित्रशिल्प, धनुर्विद्या , मुष्टीयुद्ध, द्वंद्वयुद्ध, नौकानयन, घोडदौड, भालाफेक, तलवार , मृगया यांचे शिक्षण घेत होते . मात्र तिष्य आपल्या दालनात तथागत बुद्धाच्या मूर्तीसमोर बसून ध्यानस्त व्हायचा. ज्यांना जे शिक्षण हवे त्याची सोय या पाठशाळेत करण्यात आली होती…
क्रमशः
स्रोत:(श्रीनिवास भालेराव यांच्या प्रजापिता सम्राट अशोक या पुस्तकातुन)
