दिनांक २३ डिसेंबर, श्रीगोंदा स्टेशन, श्रीगोंदा:
दौंड नगर रेल्वे महामार्गा वरती रात्री १२ वाजून ४५ मिनिटांनी सिमेंट वाहतूक करणारे मालगाडीचे डबे घसरून मोठा अपघात झाला. श्रीगोंदा रेल्वे स्टेशन पासून हाकेच्या अंतरावर हा अपघात झाला आहे. स्टेशनवर ही दुर्घटना झाली असती तर, मोठी हानी झाली असती.

घटनास्थळी रेल्वे प्रशासनाने तात्काळ दखल घेतली असून, मोठ्या प्रमाणात दुरूस्तीचे काम चालू केली आहे. दौंड, सोलापूर, अ.नगर डिव्हिजन कर्मचारी चार क्रेन, जेसीबी, पोकलेन मशीन, कर्मचारी सह युद्धपातळीवर काम चालू केले असून, सुदैवाने या दुर्घटनेत जीवितहानी टळली आहे.
स्रोत:(राजेंद्र पोकळे,श्रीगोंदा रेल्वे स्टेशन)
