कारखान्यातील मनमानी कारभार व अध्यक्षांच्या मानसिकतेला कंटाळून, उपाध्यक्ष केशव मगर यांचा राजीनामा..

दिनांक २३ डिसेंबर(श्रीगोंदा फॅक्टरी, श्रीगोंदा):

तालुक्यातील सहकारमहर्षी शिवाजीराव नागवडे सहकारी साखर कारखान्याचे विद्यमान उपाध्यक्ष केशवभाऊ मगर यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. याबाबत त्यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये अधिकृत घोषणा केली. कारखाण्यात होत असलेले अपहार व अनागोंदी कारभारास कंटाळून हा निर्णय घेतल्याचे त्यांनी स्पष्ट केले. यावेळी त्यांनी कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र नागवडे यांच्या कारभारावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

https://bit.ly/bspmycityshrigonda

या पत्रकार परिषदेस कारखान्याचे संचालक अण्णा शेलार, जिजाबापू शिंदे, कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष दीपक भोसले, बाळासाहेब काकडे, शातांराम भोईटे, रंगनाथ कुताळ, वैभव पाचपुते, शांताराम भुजबळ, औटी, पाडळे आदी मान्यवर उपस्थित होते.

सविस्तर माहिती अशी की, सहकार महर्षी शिवाजीराव नारायणराव नागवडे सह. साखर कारखान्याचे विद्यमान व्हा.चेअरमन केशवभाऊ मगर यांनी आज पत्रकार परिषदेत त्यांच्या व्हा.चेअरमन पदाचा राजीनामा दिला आहे.

याठिकाणी बोलताना मगर म्हणाले की, गेले अनेक दिवस स. म. शि. ना. ना. सह. साखर कारखान्याचे चेअरमन राजेंद्र नागवडे हे साखर कारखान्याचा कारभार मनमानी पद्धतीने करताना मला जाणवले आहेत. अनेकदा या विषयी मी संचालक मंडळाच्या मिटींगमध्ये चर्चा करण्याचा प्रसत्न केला. परंतू, चेअरमनचे काही एक ऐकुन घेण्याची मानसिकतेत दिसत नाहीत.

स्व.बापूनीं अतिशय निष्ठेने या कारखान्याची उभारणी केली. त्याच कारखान्याला तिलांजली देण्याचे काम राजेंद्र नागवडे करीत आहेत. कारखान्यात साखर विक्रि, मळी विक्री यात मोठ्या प्रमाणाम भ्रष्ट्राचार झाला आहे. गेली अनेक वर्ष मी माजी आ. स्व. शिवाजीराव नागवेड बापू यांच्या मार्गदर्शनाखाली याच सह. साखर कारखान्याचा संचालक व व्हा.चेअरमन म्हणुन काम पाहत होतो व आहे. स्व. बापूंनी सातत्याने सामान्य शेतकरी व ऊस उत्पादक शेतकरी यांच्या हिताचा विचार करुन, साखर कारखाण्यामध्ये चांगला कारभार केला. मात्र, बापुंच्या निधनानंतर विद्यमान चेअरमन यांनी शेतकरी व ऊस उत्पादक यांच्या हिताचा विचार न करता, मनमानी पद्धतीने अतिशय भ्रष्ट कारभार करताना मागिल अनेक महिन्यापासून जानवत आहेत. म्हणुन, मी माझ्या व्हा.चेअरमन पदाचा राजीनामा देत असल्याचे त्यांनी सांगितले.

स्रोत:(केशवभाऊ मगर यांची पत्रकार परिषद)

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading