दिनांक २४ डिसेंबर, श्रीगोंदा:
श्रीगोंदा तालुक्यातील कुकडी (जगताप) नागवडे (श्रीगोंदा) साईकृपा (हिरडगाव) साजन शुगर (देवदैठण) या साखर कारखान्याचा गळीत हंगाम सुरू होऊन,३ महिने होतील तरी अजून चालू हंगामाचे ऊसाचे पेमेंट मिळाले नाही. यासाठी टिळक भोस हे सातत्याने पाठपुरावा करत होते. दिनांक २२ डिसेंम्बर २०२० रोजी त्यांनी, साखर प्रादेशिक सह संचालक (साखर) अ.नगर यांच्या दालनात बेमुदत ठिय्या आंदोलनाची घोषणा केली होती , साखर आयुक्त पुणे यांना देखील पत्राद्वारे कळवले होते होते.

साईकृपा हिरडगाव या कारखान्याकडे मागील ३ हंगमापासून थकीत बाकी आहे. तसेच, ऊस वाहतूकदार व कामगार यांचे देखील देणी बाकी आहेत. त्यामुळे साईकृपा हिरडगाव वर साखर आयुक्त यांनी RRC ची कारवाई केली होती. तसेच, कुकडी (जगताप) सा. का. यावर देखील RRC ची कारवाई करण्यात आली होती. मात्र, आज पर्यंत (कुकडी) जगताप कारखाना यांनी ५००/- रुपये प्रति टन प्रमाणे अनेक शेतकऱ्यांचे ऊसाचे पेमेंट दिलेले नाही.
तसेच चालू गळीत हंगाम सूरु होऊन जवळपास अडीच महिने होतील तरी सुद्धा आजपावेतो तिन्ही कारखानदार यांनी ऊसाची रक्कम दिलेली नाही दिनांक २१ डिसेंम्बर २०२० रोजीच्या प्रादेशिक सह संचालक (साखर) अहमदनगर यांच्या पत्रानुसार नागवडे (श्रीगोंदा) ४२ कोटी ३२ लाख, जगताप (कुकडी) ३६ कोटी ४२ लाख, साजन शुगर ९ कोटी ११ लाख एवढी रक्कम आज पावतो येणे बाकी आहे. तसेच, साईकृपा हिरडगाव व कुकडी कडील मागील बाकी पाहिल्यास जवळपास १०० कोटींच्या जवळपास शेतकऱ्यांची बाकी येणे आहे.
त्यामुळे भोस यांनी सह प्रादेशिक सह संचालक कार्यालय मध्ये बेमुदत ठिय्या आंदोलन सुरू करण्याचा इशारा दिला होता. त्याची दखल घेत- नागवडे कारखाना यांनी १५ डिसेंबर पर्यंत तोडलेल्या ऊसाचे पेमेंट आठवड्यात जमा होईल असे कळवले आहे. ३० डिसेंबर पर्यंत तुटलेल्या ऊसाचे पेमेंट एक आठवड्यात जमा करण्यात येईल असे. प्रा. सह संचालक साखर यांस कळवले असल्याने भोस यांनी आंदोलन काही काळासाठी स्थगित केले आहे.
दिनांक २३ डिसेंम्बर २० रोजी, मा. शेखर गायकवाड साखर आयुक्त महाराष्ट्र राज्य यांनी अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती स.बँक येथे प्रादेशिक सह संचालक/ सर्व सहकारी/ खासगी कारखान्याचे कार्यकारी संचालक/ बँकेचे दि. अहमदनगर जि मध्य सह बँकेचे कार्यकारी संचालक/ जिल्हाधिकारी व पोलीस प्रशासन यांची संयुक्त बैठक घेवून ऊसाचे पेमेंट तातडीने देण्याच्या सूचना दिल्या. तसेच भोस यांनी त्यांची भेट घेऊन कुकडी व साईकृपा हिरडगाव या कारखान्याची तक्रार केली असता, दिनांक ६ जानेवारी २०२१ पर्यंत शेतकऱ्यांची थकबाकी न देणाऱ्या कारखान्यांवर कडक कारवाई करण्याचे आश्वासन दिले व जिल्हाधिकरी यांना तशा सूचना देऊन पुढील कारवाई होईल असे आश्वासित केले. एकंदरीत भोस यांच्या पाठपुरव्याला काही प्रमाणात यश आले असून, त्यामुळे श्रीगोंदा तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना थोडासा दिलासा मिळणार आहे.
स्रोत:(टिळक भोस यांचे प्रसिद्धी पत्र)
