सचिवची बतावणी, बनावट नियुक्ती पत्रांचे सोंग: ३० तरुणांची लाखोंची फसवणूक; श्रीगोंद्याच्या पाचपुते यांच्या तक्रारीनंतर आरोपी अटकेत..

दिनांक ६ एप्रिल २०२५, श्रीगोंदा/पुणे:

पुण्यात महसूल विभागाचा सचिव असल्याची बतावणी करत आणि सरकारी नोकरीचे आमिष दाखवत महादेव दराडे आणि सहायक क्लार्क रणजीत चौरे या दोघांनी तब्बल ३० तरुणांची फसवणूक केली.

महसूल, वनविभाग आणि पोलिस खात्यात क्लास वन, टू पदांवर नोकरी लावतो असे सांगून त्यांनी प्रत्येकीकडून १ लाख ते २० लाख रुपये उकळले.

बनावट नियुक्ती पत्रे तयार करून तरुणांचा विश्वास संपादन केला. श्रीगोंद्याच्या सुरज पाचपुते या तरुणाने तक्रार दाखल केल्यानंतर गुन्हे शाखा युनिट दोनने तपास करून आरोपींना अटक केली.

दराडे हा रिअल इस्टेट एजंट असून त्याने शासकीय कार्यालयातील ओळखीचा गैरवापर करत तरुणांना गंडवले.

स्रोत:(ऑनलाईन वृत्त)

Advertise..

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading