मेहकरी येथे समाधान महाराज यांचा पत्रकार म्हणून सन्मान; ‘निर्भीड कलम’साठी तृतीयपंथी प्रतिनिधीपदाची नेमणूक..

दिनांक ६ एप्रिल २०२५, श्रीगोंदा/मेहकर:

आष्टी तालुक्यातील मेहकरी येथे सुरू असलेल्या अखंड हरिणाम सप्ताहाच्या पवित्र प्रसंगी समाधान महाराज यांचा पत्रकार म्हणून सन्मान करण्यात आला. ‘निर्भिड कलम: आपली बातमी, आपला आवाज’ या website साठी श्रीगोंदा तालुका प्रतिनिधी म्हणून समाधान महाराज यांची नेमणूक झाली असून, ते तालुक्यातील पहिले तृतीयपंथीय पत्रकार ठरले आहेत.

या विशेष गौरवामुळे मेहकरी ग्रामस्थांच्या वतीने समाधान महाराज यांचा सार्वजनिक सन्मान करण्यात आला.

सन्मान सोहळ्यावेळी महादेव महाराज जगताप, दत्तू बनसोडे, सुभाष बनसोडे, राम जगताप, बनसोडे सर, आजिनाथ महाराज जाधव, सोमनाथ महाराज मेटे, भाजप तालुका अध्यक्ष आश्या जगताप यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या गौरवाने सामाजिक समावेशाच्या दिशेने एक सकारात्मक पाऊल टाकण्यात आले असून, तृतीयपंथीय व्यक्तींनाही समाजमाध्यमातून आपली भूमिका मांडण्याची संधी मिळत असल्याचे या निमित्ताने अधोरेखित झाले आहे.

स्रोत:(पत्रकार संभाजी घोडके)

Advertise..

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading