श्रीगोंद्यात पुरोगामी संघटनांकडून राजगृहावरील हल्याचा निषेध..

दिनांक ११ जुलै,श्रीगोंदा:

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या दादर,मुंबई येथील निवासस्थान असलेल्या राजगृह या बंगल्यावर दिनांक ७ जुलै रोजी काही इसमांकडून दगडफेक करीत, सीसीटीव्ही कँँमेरे, खिडक्यांच्या काचा व झाडांच्या कुंड्यांची नासधूस करण्यात आली होती. बाबासाहेबांनी राजगृह हे पुस्तकांसाठी बांधलेले घर जागतिक दर्जाची इमारत व भारतीयांचे श्रद्धास्थान आहे. मात्र, या ठिकाणी काही विक्षिप्त मनोवृत्तीच्या लोकांनी हल्ला करून तोडफोड केली होती. याचा समाजातून मोठ्या प्रमाणे निषेध करण्यात आला.

श्रीगोंदा तालुक्यातही अनेक सामाजिक संघटनांनी नमूद घटनेचा निषेध नोंदवला. दलित महासंघ, बहुजन समाज पार्टी, संभाजी ब्रिगेड, ऑल इंडिया पॅंथर सेना, महापुरुष जयंती उत्सव समिती, वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांनी राजगृहावरील घटनेचा निषेध करीत, स्थानिक प्रशासनास निवेदन सादर केले.

यावेळी (वंचित बहुजन आघाडीचे) संतोष जौजांळ, सुनील फासगे, संतोष शिंदे, महेंद्र थोरात, जयेश थोरात, राहुल छत्तीशे, उमेश वेताळ, विजय धुळे, संभाजी फासगे, विजय जौजांळ, अनिकेत कदम, कांतीलाल काळे, सागर ससाने, युवराज थोरात, लाला धुळे, तसेच अँँडव्होकेट प्रकाश लोंढे यांच्या बरोबर योगेश शिंदे, राजेंद्र भालेराव, गिरीश भालेराव, संतोष शिपलकर, बाळू शेलार, विजय भालेराव, लखन भालेराव, अक्षय कापडे, निखील मोरे, राहुल मोरे, दत्तात्रय शेलार, अंकुश ढमढेरे, दलित महासंघातर्फे सलीम सय्यद, चंद्रकांत सकट, प्रमोद शेंडगे यांनी निषेधाचे निवेदन सादर केले.

सदर निवेदन (श्रीगोंद्याचे तहसीलदार) महेंद्र माळी, (नायब तहसीलदार) ढोले मॅडम, (श्रीगोंदा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक) दौलतराव जाधव, (बेलवंडी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक) अरविंद माने यांच्यासह स्थानिक प्रशासनास देण्यात आले असून, असे दुष्कृत्य करणाऱ्या आरोपींवर कारवाईची मागणी करण्यात आली आहे.

वंचीत बहुजन आघाडी तर्फे:

दलित महासंघा तर्फे:

सामाजिक कार्यकर्ते प्रकाश लोंढे यांचे तर्फे:

(स्रोत:संघटनांनी दिलेले निवेदन व मिळालेली माहिती)

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading