दिनांक १९ जून,श्रीगोंदा:
सुफी संत हजरत मोईनुद्दीन चिस्ती गरीब नवाज यांच्या विषयी आक्षेपार्ह वक्त्यव करणारे न्युज चॅनल अँकर आमिष देवगण याच्यावर कडक कारवाई होनेबाबतची मागणी ‘जमीयत उलेमा ए हिंद’ (युथ क्लब)चे सेक्रेटरी जैद अत्तार व उपअध्यक्ष शहानवाज इनामदार यांनी श्रीगोंदा तहसीलदार यांना निवेदनाद्वारे केली आहे.
यावेळी, जमीयत उलेमा ए हिंद युथ क्लब चे शहानवाज भाई इनामदार, जैद भाई आत्तर, अजीम भाई जकाते, मुजाहिद भाई शेख, जियाद भाई इनामदार व इम्तियाज ताडे सह पदाधिकारी निवेदन देताना उपस्थित होते.
दिनांक १६ जून २० रोजी “न्युज १८ इंडिया” न्युज चॅनेलचे अँकर अमीश देवगन यांनी ‘आरपार’ या कार्यक्रमात सुफी संत हजरत मैनुद्दीन चिश्ती गरीब नवाज यांच्या विषयी अक्षेपार्ह वक्तव्य केले होते. सुफी संताविषयी आदर असणाऱ्या समुदायांमध्ये या वक्तव्यामुळे तीव्र नाराजी निर्माण झाली. त्याचे पडसाद म्हणून, सर्वत्र या घटनेच्या निषेधार्थ प्रशासनास निवेदन सादर करण्यात आले.
देशभरात देवगन याच्या सह त्याच्या कार्यक्रमाचा निषेध करण्यात आला. सदर घटनेसह व्यक्तीच्या जाहिर निषेध करण्याबरोबर, न्युज चॅलन अँकर अमीश देवगन याचेवर कडक कायदेशीर कारवाईची मागणी जोर धरत आहे.
श्रीगोंदा तालुक्यातही विविध संघटनांच्या माध्यमातून देवगण याच्या वक्तव्यावर आक्षेप नोंदवला जात असून, स्थानिक प्रशासनास कारवाईसाठी निवेदनं दिली जात आहेत.
