डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या राजगृह या निवासस्थानी झालेल्या तोडफोडीच्या निषेधार्थ, श्रीगोंद्यातील विविध संघटनांकडून निषेध निवेदन सादर.

दिनांक ८ जुलै,श्रीगोंदा:

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे दादर/मुंबई स्थित असलेले राजगृह हे निवासस्थान जे अनेक घटनांचे साक्षीदार आहे. येथे काही विक्षिप्त इसमांनी कार्यक्षेत्रात घुसून झाडांची नासधूस करीत राजगृह या निवासस्थानातील सीसीटीव्ही कॅमेरे आणि खिडक्यांच्या काचा दगडाने फोडल्या असल्याचे निदर्शनास आले आहे.

या निंदनीय घटनेचा राज्यभर निषेध करण्यात येत आहे. याप्रमाणेच श्रीगोंदा तालुक्यातील विविध सामाजिक संघटनांच्या माध्यमांतून राजगृहावर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ स्थानिक प्रशासनाला निवेदन देण्यात आले. यामध्ये ऑल इंडिया पँथर सेना, बहुजन समाज पार्टी, युथ फोर्स फॉर डेमोक्रॅटिक इंडिया तसेच महापुरुष जयंती उत्सव समिती व संघर्ष प्रतिष्ठान मढेवडगाव मार्फत निषेध करीत आरोपींना तात्काळ अटक करण्याची मागणी करण्यात आली.

श्रीगोंद्याच्या नायब तहसीलदार ढोले मॅडम व पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव यांना याविषयीचे निवेदन देण्यात आले. तालुक्यातील आंबेडकरी अनुयायांच्या भावना शासनापर्यंत पोहोचवण्याचे या यात नमूद करण्यात आले.

सदरील निवेदन देतेवेळी जिल्हा परिषदेचे माजी सदस्य अनिल ठवाळ, ऑल इंडिया पॅंथर सेनेचे जिल्हा उपाध्यक्ष अमर घोडके, युथ फोर्स फॉर डेमोक्रॅटिक इंडियाचे संस्थापक अध्यक्ष भालचंद्र सावंत, सामाजिक कार्यकर्ते राहुल साळवे, प्राध्यापक योगेश मांडे, प्राध्यापक गोरख उंडे, पत्रकार अनिल तुपे, अँँडव्होकेट प्रकाश लोंढे, अभय गुंड, अक्षय ससाने, मीनाताई राहिंज सह सामाजिक चळवळीत सक्रिय असणाऱ्या कार्यकर्त्यांनी निवेदन देऊन या  घटनेचा निषेध नोंदविला आहे.

(स्त्रोत:सामाजिक कार्यकर्त्यांनी दिलेले निवेदन व मिळालेल्या माहितीनुसार)

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading