कृषि उत्पन्न बाजार समिती श्रीगोंदा यांना पेडगांव येथील शेतमाल व मासोळी उप बाजार समिती सुरु करण्याचे निवेदन..

दिनांक ८ जुलै,श्रीगोंदा:

पेडगांव येथील शेतकरी व मासेमारी करणाऱ्यांकडुन उप बाजार समिती सुरु करण्याचे निवेदन आज सादर करण्यात आले आहे.यावेळी बाजार समितीचे (सचिव) दिलीप डेबरे, (उप सचिव) संपत शिर्के, (बाजार समितीचे संचालक) दादासाहेब शिर्के, भाऊ गावडे, शफीक हवलदार, बशिर तांडेल आदि मान्यवर उपस्थित होते.

उप बाजार समिती सुरु केल्यास अनेक शेतकऱ्यांना व मासेमारी करणाऱ्यांना बांधवांना त्याच्या मालाचे चांगले दर मिळणार असून, त्यांना भिगवण कींवा इंदापुरला जाण्याची गरज लागणार नाही.अहमदनगर जिल्यातील दक्षिण विभागात हा पहीला मासोळी बाजार आसणार आहे.

(स्रोत:पत्रकार शफीक हवलदारयांच्या कडून मिळालेल्या माहितीनुसार)

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading