दिनांक ८ जुलै,मुंबई/श्रीगोंदा:
मुंबईत दादर या ठिकाणी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे निवासस्थान असलेल्या राजगृहावर अज्ञातांनी तोडफोड केल्याची घटना उघडकीस आली आहे. राजगृह या ठिकाणी असलेला सीसीटीव्ही कॅमेरा आणि झाडांच्या कुंड्याची तोडफोड करण्यात आली आहे. ही घटना घडताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले . यानंतर आता राज्यातील विविध घटकांकडून या घटनेचा निषेध नोंदवण्यास सुरुवात झाली आहे.
पवित्र वास्तूची अशी तोडफोड होणे संतापजनक आहे. हे कृत्य करणाऱ्या व्यक्ती व मानसिकतेचा निषेध” नोंदवला जात आहे. नगर जिल्ह्यातही विविध ठिकाणी नमूद घटनेचा निषेध करण्यात येत असून, आज श्रीगोंदा तालुक्यातही या घटनेच्या निषेधार्थ स्थानिक प्रशासनास निवेदन देण्यात येणार असल्याचे समजते आहे.
(स्रोत:सामाजिक माध्यम व वृत्तपत्रांतून मिळालेल्या माहितीनुसार)
