महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी संघटना (आयटक)च्या अहमदनगर जिल्हा कार्यकारिणी सदस्य पदी बाळासाहेब आल्हाट.

दिनांक ८ जुलै, पारगाव/श्रीगोंदा:

महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी संघटना (आयटक)ची अहमदनगर जिल्हा कार्यकारिणी ची वार्षिक सर्वसाधारण सभा अँँडव्होकेट सुभाष लांडे यांचे अध्यक्षतेखाली नुकतीच पार पडली. यावेळी श्रीगोंदा तालुक्यातुन श्री. बाळासाहेब भाऊसाहेब आल्हाट (पारगाव सुद्रिक) यांची जिल्हा कार्यकारिणी सदस्यपदी सर्वानुमते निवड करण्यात आली. तसे निवडीचे पत्र सुधीर टोकेकर यांनी त्यांना दिले.

यावेळी बाळासाहेब आल्हाट बोलतांना म्हणाले, ग्रामपंचायत कर्मचारी हे खरोखरच उपेक्षित कर्मचारी आहेत. त्यांच्या अनेक समस्या आहेत. सरकार दप्तरी आमची कुठलीही दखल घेतली जात नाही. गेल्या दोन महिन्यापासून ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना ऑनलाईन पगार झालेला नाही. कित्येक कर्मचाऱ्यांचे अद्याप सेवा पुस्तके हि भरलेली नाहीत. भविष्यनिर्वाह निधीच्या खात्यात दरमहा रक्कम जमा होत नाही. असे अनेक प्रश्न आहेत. नमूद प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करणार असल्याची ग्वाही या निवडीच्या निमित्ताने आल्हाट यांनी उपस्थितांना दिली आहे. आल्हाट यांच्या निवडीबद्दल त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.

स्त्रोत:(बाळासाहेब आल्हाट यांनी प्रशिद्धीस दिलेल्या माहितीनुसार )

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading