दिनांक १६ जून,श्रीगोंदा:
पिंपरी-चिंचवड व नागपूर येथील दलित अत्याचाराच्या निषेधार्थ आरोपींवर कठोर शासन व्हावे या मागणीचे निवेदन आज तालुक्यातील बहुजन चळवळीतील कार्यकर्त्यांनी तहसीलदार तथा पोलीस निरीक्षक यांना दिले आहेत.
छत्रपती शिवाजी महाराज, विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतीबा फुले, शाहु महाराज अशा महापुरुषांच्या पुरोगामी महाराष्ट्रामध्ये माणुसकीला काळीमा फासणाऱ्या घटना वारंवार घडत आहेत. ज्या महापुरुषांनी कधीच जाती मानल्या नाहीत. समता मुलक समाज व्यवस्था निर्माण केली. त्याच महापुरुषांच्या जन्म व कर्मभूमीत आज जातीय द्वेषातून एक नव्हे तर एका पाठोपाठ एक हत्याकांड घडत आहेत. यात दलित समाजाचे युवक जे उद्या देशाचे भवितव्य आहेत. अशा उच्चशिक्षित युवकांची जातीय देशातुन हत्या होत आहे. नागपुर तालुका नरखेड येथील युवक अरविंद बनसोड या युवकाची जातीय व्देषातून हत्या होते आणि गुन्हेगारांनी स्वत:च्या बचावासाठी मृत युवकाच्या मुखात विष ओतुन हे प्रकरण हत्या नसुन आत्महत्या आहे. असे भासवण्याचा प्रयत्न करतात. त्या ठिकाणी असणाऱ्या पोलिस प्रशासनाने गुन्हेगारांवर ३०२ चे खटले दाखल करण्याऐवजी किरकोळ मारहाणीचा गुन्हा दाखल करून, सदरील घटना ही आत्महत्या असल्याचे नमुद केले आहे.
दुसरी घटना पुणे पिंपरी चिंचवड (पिंपळे सौदागर) येथील आहे. विराज जगताप वय(वर्ष २०) या युवकाची प्रेम प्रकरणातुन हत्या करण्यात आली. अशा एक नाही अनेक घटना घडत आहेत. जातीयवादी बांडगुळांना कायद्याचा धाक राहीला आहे की नाही? असा प्रश्न निर्माण झालेला आहे. सदरील दोन्ही घटनेतील आरोपींच्या चांगल्या मुसक्या आवळल्या पाहिजेत. नाहीतर अत्याचारांच्या घटना वाढतील आणि सर्वसामान्य जनतेचा कायदा सुव्यवस्थेवरून विश्वास उठेल. असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
दोन्ही घटनांची सी.बी.आय.मार्फत चौकशी व्हावी व गुन्हेगारांवर ३०२ अन्वये खुनाचा गुन्हा दाखल करून, त्यांना फाशीची शिक्षा व्हावी. असे निवेदन स्थानिक प्रशासनास देण्यात आले आहे. निवेदन देतेवेळी तालुक्यातील उच्चशिक्षित व सामाजिक क्षेत्रात अग्रणी असलेल्या कार्यकर्त्यांनी हे निवेदन सुपूर्त केले असून, यावेळी रविंद्र सुरेश पानसरे, प्रमोद कैलास थोरात,राहुल (दादा) अशोक लोंढे, विलास जयवंत कांबळे (पश्चिम महाराष्ट्र संघटक लोकजनशक्ती पार्टी), विजय तात्याबा भालेराव, राजेंद्र उद्धव भालेराव, योगेश हनुमंत शिंदे, नटवर नामदेव मोरे, संदीप विवाह शेलार, राहुल प्रल्लाद मोरे, गणेश अशोक मोरे, सुनील निवृत्ती भालेराव, किरण नामदेव मोरे, भाऊसाहेब रामभाऊ मोरे, संतोष हरिभाऊ शेलार, छगन हिरामण भालेराव, दीपक कोंडीबा मोरे, अंकुश भाऊसाहेब ढमढेरे, महादेव भाऊसाहेब ढमढेरे, सह लखन लालासो भालेराव इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते.श्रीगोंदा पोलीस स्टेशनचे पोलीस हेड कॉन्स्टेबल रेवणनाथ दहिफळे यांनी हे निवेदन स्वीकारले आहे.
