दिनांक १६ जून, श्रीगोंदा:
श्रीगोंदा येथील दत्ताजी जगताप यांनी नगर जिल्हाधिकारी राहुल व्दिवेदी यांचे लहानपणापासुन आजपर्यंतच्या कर्तव्यावर व जीवनावर कविता तयार केली आहे. सोमवार रोजी जिल्हाधिकारी यांची सदिच्छा भेट घेऊन कविता केलेली फोटो फ्रेम सविनय भेट केली देण्यात आली आहे.
दक्ष नागरिक फाऊंडेशन ही सामाजीक सेवाभावी संस्था गेली दोन महिन्यांपासुन कोरोना विषाणु फैलाव रोखण्यासाठी दोन जिल्ह्यात सहा तालुक्यात एकशे ऐंशी गावामध्ये दोनशे पंचाऐंशी ठिकाणी जाऊन नागरिकांमध्ये जनजागृती केली आहे. अजुनही हे काम अव्यहतपणे सुरु आहे.
जिल्हाधिकारी राहुलजी व्दिवेदी यांनी सुध्दा जीवाची पर्वा न करता बाजी लावुन कोरोनाला रोखण्यासाठी काम केले आहे. याचे कौतुक व अभिनंदन कवितेच्या माध्यमातुन मांडण्यात आलेली आहे. कविता वाचल्यानंतर जिल्हाधिकारी राहुल व्दिवेदी यांनी खुष होऊन कविता रचना करणारे सामाजीक कार्यकर्ते दत्ताजी जगताप यांचे धनेश गुगळे, नारायण ढाकणे, नितीन चव्हाण व दक्ष नागरिक फाऊंडेशनचे मनापासुन कौतुक करुन अभिनंदन केले आहे.
