दिनांक २७ ऑगस्ट,श्रीगोंदा:
गेल्या आठवड्यात विसापूर फाटा, तालुका श्रीगोंदा येथे स्वस्त सोन्याच्या खरेदी विक्रीच्या प्रकरणातून चार जनांचे हत्याकांड प्रकरण घडले होते.मुळात स्वस्तात सोन्याच्या विक्रीचे आमीश दाखविणे आणि स्वत्तात सोन्याच्या खरेदीची हव्यासा ठेवणे या दोन्ही बाबी बेकायदेशीर असून, अशा बेकायदेशीर कृत्याचे कोणीही समर्थन करु शकत नाही. मात्र, आज दिनांक २७ ऑगस्ट २०२० रोजी दैनिक मराठवाडा केसरी या वर्तमानपत्रात दिलेल्या बातमीमध्ये विनाकारण आदिवासी पारधी समाजाला बदनाम करण्याचा प्रकार समोर आला आहे. शंभर अरपराधी सुटले तरी चालतील. परंतू, एकही निरपराध व्यक्तीला न केलेल्या गुन्ह्याची शिक्षा होऊ नये, नवरऱ्याने केलेल्या गुन्ह्याची शिक्षा पत्नीला दिली जात नाही. ना त्याच्या मुलांना. आरोपी हाच आरोपी असतो. तसेच त्याच्या दुष्कृत्याचा आणि त्याच्या कुटुंबाचा, जातीचा, धर्माचा, वर्गाचा त्या दुष्कृत्याशी काही संबंध नसतो. असं या देशाचा कायदा सांगतो. मात्र, चार गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांमुळे संपुर्ण पारधी समाजाची बदनामी कदापी खपवून घेतली जाणार नाही. असे विधान प्रमोद काळे यांनी या प्रकरणाच्या अनुषंगाने केले आहे.
त्यांनी प्रसिद्धीस दिलेल्या माहितीनुसार देशात स्वातंत्र्यपूर्व व स्वतंत्र्योत्तर दोन्ही कालखंडात, देशाच्या जडणघडणीत पत्रकार आणि पत्रकारीतेचे अनन्यसाधारण योगदान राहिले आहे. आजवर अनेक अन्याय, अत्याचाराच्या घटना असतील. तसेच दलित, आदिवासी, शेतकरी, कष्टकरी, असंघटित कामगारांच्या समस्या जगासमोर मांडून त्यांची शासन दरबारी दखल घेण्यास भाग पाडणाऱ्या सर्व पत्रकारांचा आणि त्यांच्या पत्रकारीतेचा आदर आहेच. मात्र, चार गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांमुळे संपुर्ण पारधी समाजाची बदनामी करणे. हे कोणत्याही परिस्थितीत स्विकार्ह्य नाही.असेही त्यांनी नमूद केले आहे.याचबरोबर सदरील प्रकरणी दैनिक मराठवाडा केसरीच्या वतीने संपूर्ण आदिवासी पारधी समाजाची जाहीर माफी मागावी.अन्यथा कायदेशीर कारवाई साठी तयार रहावे.असे आवाहनही प्रमोद काळे (अध्यक्ष, लोकशिक्षण प्रतिष्ठान) यांनी केले आहे.
स्रोत:(प्रमोद काळे यांनी प्रसिद्धीस दिलेली माहिती)
