दिनांक २७ ऑगस्ट,शिर्डी/श्रीगोंदा:
शिर्डी येथील स्नेहा दिवे या बौद्ध तरुणींबरोबर प्रेमाचं नाटक करून तिला सतत त्रास दिला गेला, तीचा छळ करण्यात आला, आरोपी हा शेख नामक इसम आहे. त्याने दुसरीकडे लग्न करून तिला फुस लावून, टोकाचा त्रास दिला. पीडितेचे आईवडील हातावर पोट भरणारे आहेत. आर्थिक परिस्थिती मुळे जगण्याची झुंज चालू आहे.
ते कामाला गेल्यावर घराच्या मागे राहणाऱ्या गल्लीतील या आरोपीने पीडितेला फुस लावून तिच्या भावनेशी खेळून, तिला त्रास दिला. त्याने दुसरीकडे लग्न केले आणि लग्न केल्यावरही मानसिक त्रास दिला. त्यामुळे स्नेहाने फाशी घेऊन आत्महत्या केल्याचे घरच्यांनी नमूद केले आहे.
याविषयी ऑल इंडिया पँथर सेनेचे अध्यक्ष दीपक केदार यांनी आवाज उठवत, प्रशासनास धारीवर धरले. पीडित कुटुंबाच्या न्यायिक हक्कासाठी त्यांनी संघटनेमार्फत आवाज उठवला आहे. ते यावेळी म्हणाले की, अनुसूचित जातीच्या मुलींना संपवलं जातंय, हा मोठा धोका निर्माण झाला आहे. अमरावती, मांडवा येथे प्रियांका सोनवणे हिने अश्याच त्रासाला कंटाळून आत्महत्या केली. प्रियंका सोनोने आत्महत्या केली, स्नेहा दिवेनी आत्महत्या केली. या देशात महिलांचे रक्षण होणार आहे की नाही ? महिला आयोग कुठे आहे ? या गृहमंत्र्यांच्या काळात अचानक महिला असुरक्षित कशा काय झाल्या ? बेटी बचाव की बेटी मिटाव ? सरकारचा नेमका नारा कोणता आहे ? असा सवाल ही त्यांनी यावेळी उपस्थित केला.
एका पाटोपाट एक दलित हत्याकांड होत आहेत. सरकार मात्र, ब्र शब्द बोलायला तयार नाही. दलित विरोधी भूमिका योग्य नाही. ऑल इंडिया पँथर सेना या घटनेचा निषेध करत आहे. आरोपिवर अट्रोसिटी ऍक्ट ३(२)(५), ३०५ अंतर्गत कार्यवाही झालेली आहे. आरोपीवर कठोर कार्यवाही झाली पाहिजे. पीडित कुटुंबाला शासनाने तात्काळ मदत केली पाहिजे. स्नेहा ही इंग्लिश मिडीयम मध्ये शिकत होती. अतिशय हुशार होती. ती अल्पवयीन होती. अल्पवयीन मुलीला फसवून तिचा घात करण्यात आला. असल्याचे केदार यांनी यावेळी नमूद केले आहे.
या घटनेमुळे आंबेडकरी जनतेमध्ये संताप आहे. ही तीच शिर्डी आहे. जिथे सागर शेजवळ हत्याकांड घडलं, हा तोच नगर जिल्हा आहे. जिथे सर्वात जास्त दलित हत्याकांड झाले आहेत.गृहमंत्री आमचा अंत पाहत आहेत. आता आम्ही उद्रेकाच्या उंबरठ्यावर आहोत. न्याय देत नसाल. तर, आम्हाला न्याय मागण्याची भाषा बदलावी लागेल, हे लक्षात घ्या ! असे आवाहनही ऑल इंडिया पँथर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष दीपक केदार यांनी राज्य सरकारला उद्देशुन केले आहे. यावेळी ऑल इंडिया पँथर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष दीपक केदार, युवा नेता आकाश जाधव, युवा नेता सम्राट पट्टेकर, सागर शेजवळचे भाऊ आकाश शेजवळ उपस्तीत होते.
याच बरोबर ऑल इंडिया पँथर सेनेचे जिल्हाध्यक्ष योगेश थोरात, जिल्हा उपाध्यक्ष अमर घोडके, युवाध्यक्ष सागर ठोकळ यांनीही या घटनेचा निषेध केल्याचे माध्यमांना कळविले आहे.
स्रोत:(ऑल इंडिया पँथर सेना जिल्हाउपाध्यक्ष अमर घोडके यांनी प्रसिद्धीस दिलेली माहिती.)
