निलेश लंकेंना श्रीगोंद्यातील एकलव्य संघटनेचा जाहीर पाठिंबा..

दिनांक १७ एप्रिल २०२४, श्रीगोंदा:

दिनांक १५ एप्रिल २०२४ रोजी सुपा जिल्हा परिषद गट व पारनेर शहराच्या वतीने स्वाभिमान जनसंवाद यात्रेचे स्वागत करण्यात आले. निलेशजी लंके यांना समर्थन देण्यासाठी सुपा येथे हजारोंचा समुदाय जमला असताना एकलव्य संघटना महाराष्ट्र राज्य यांनी त्या ठिकाणी जाहीर पाठींबा दिला आहे. याबाबत संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी प्रसिद्धीस माहिती दिलेली आहे.

त्यात त्यांनी नमूद केले आहे की, यावेळी जिल्हाध्यक्ष सीताराम बर्डे यांनी त्यांचे मनोगत व्यक्त केले व ८ तालुक्यातून आमचा लोकनेते निलेश लंके यांना १००% पाठिंबा देत आहोत.. असे जाहीर केले.

निलेश लंके प्रतिष्ठानचे मांडवगण (गट प्रमुख) अमोल बोरुडे, (गण प्रमुख) हेमंत लोखंडे, श्रीगोंदा (तालुकाध्यक्ष) सुभान तांबोळी यांचे यावेळी आभार मानण्यात आले.

या प्रसंगी एकलव्य संघटनेचे (श्रीगोंदा तालुकाध्यक्ष) जंबो अलोट, सीताराम बर्डे (अ.नगर जिल्हाध्यक्ष), मोहन गोलवड (राज्य संघटक), सौ. वैजयंता गोलवड, संपत पवार (पारनेर ता.अध्यक्ष) उपस्थित होते.

स्रोत:(प्रसिद्धी पत्र)

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading