श्रीगोंद्यातील हे गावं मतदानावर का टाकणारं आहे बहिष्कार ..? ही आहेत कारणं..!

दिनांक १७ एप्रिल २०२४, श्रीगोंदा:

श्रीगोंदा तालुक्यातील विविध सुविधा आणि शासकीय योजना राबवुन तसेच, राबवण्याचे नुसतं आश्वासनं देण्याऱ्या राजकीय नेत्यांनी आमच्या गावात येऊ नये.. लोकसभा निवडणुक २०२४ च्या मतदानवर आम्ही बहिष्कार टाकनार असल्याचे पत्र निंबवी गाव ग्रामस्थांच्या वतीने सरपंच ठकसेन शिर्के यांनी काढले असुन, त्याची एक प्रत माध्यमांना प्रसिध्दीस दिली आहे.

त्यात नमूद करण्यात आले आहे की, सर्व राजकीय पक्षांना विनंती करण्यात येते की, मौजे निंबवी तालुका श्रीगोंदा गावची ९०० हेक्टर जमीन विसापूर तलावात १९४८ साली अधिग्रहित केली असुन, आमच्या गावाला ना धरणग्रस्त दाखला ना हक्काचे पाणी मिळते.. वेळोवेळी विवीध राजकीय पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून, त्यांनी फक्त आम्हाला पाणी सोडण्याचे आश्वासनं दिले आहे. परंतु, पाण्याचा एक थेंब ही तलावात सोडलेला नाही. यामुळे आमच्या निंबवी गावात कोणत्याही राजकीय व्यक्तीने येऊ नये. आम्ही मतदान केंद्रावर कोणत्याही पक्षाचे बूथ लावू देणारं नाही व आम्ही निंबवी गावचे सर्व ग्रामस्थ मतदानावर बहिष्कार टाकनार आहोत. याची सर्व राजकीय पक्षांनी दखल घ्यावी..! अशी माहिती त्यात स्पष्ट करण्यात आली आहे.

एक एक मत महत्वाचे असणाऱ्या या निवडणुकीत सदर निंबवी गावच्या ग्रामस्थांची मतदान बहिष्कार करण्याची भावना कोणता पक्ष आणि राजकीय व्यक्ती..? जाणून दखल घेतायेत.. हे लवकरच निदर्शनात येईल.

स्रोत:(ग्रामपंचायतचे पत्र)

ग्रामपंचायतचे पत्र

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading