मामाच्या गावी गेलेल्या १० वर्षीय ओमवर काळाचा घाला!

दिनांक १८ सप्टेंबर, श्रीगोंदा:

श्रीगोंदा तालुक्यातील वेळू गावाच्या १० वर्षीय ओम अनिल शेळके सोबत दुर्घटना घडली, त्यावेळी आई ललिता ही पोथरे/करमाळा येथे माहेरी आली होती. ललिताचे वडील आत्माराम झिंजाडे यांचे शेत सीना नदीकाठी आहे. गावी आल्यावर ललिता जनावरे चारण्यासाठी शेतात गेली होती. ओम आईसोबतच होता व खेळतांना नदी काठावरून पाण्यात पडला. दिनांक १४ सप्टेंबर मंगळवारी ही दुर्दैवी घटना घडली.

त्या रात्री आठ वाजेपर्यंत ओमला शोधण्याचा प्रयत्न केला. परंतु, तो सापडला नाही. दिनांक १५ सप्टेंबर बुधवारी सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास त्याचा मृतदेह पोटेगाव बंधाऱ्याच्या लगत महानंदाच्या झाडाला अडकल्याचे स्थानिक बाळू झिंजाडे यांनी पाहिले. इतरांना आवाज देत, त्यांनी तो मृतदेह बाहेर काढला. तर, तो ओमचा मृतदेह होता.

वेळू/श्रीगोंदा येथून पोथरे/करमाळा येथे मामाच्या गावी आलेल्या ओम सोबत झालेल्या या भयानक घटनेनंतर त्याचा मृतदेह पाहुन आई ललिता व सर्व झिंजाडे परिवारात मोठा आक्रोश झाला. तसेच, पोथरे गावही हळहळले आहे. Put black time on 10 year old Om who went to his uncle’s village!

स्रोत:(ऑनलाइन वृत्त)

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading