श्रीगोंदा पोलीसांची वेगवान कारवाई: आरोपी बापु झुंबर दातीर ४ तासात अटकेत..

दिनांक १२ ऑगस्ट २०२४,श्रीगोंदा:

श्रीगोंदा पोलीसांनी तात्काळ केलेल्या कारवाईत गुन्हा नोंदविण्यात आलेल्या आरोपीला अवघ्या ४ तासात पकडण्यात यश मिळवले आहे. भारतीय न्याय संहिता कलम १०३(१) अंतर्गत नोंदविण्यात आलेला आरोपी बापु झुंबर दातीर याला श्रीगोंदा पोलीसांनी डोंगराळ भागातून अटक केली.

अहमदनगर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक मा.श्री. राकेश ओला, अप्पर पोलीस अधीक्षक मा.श्री. प्रशांत खैरे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी मा.श्री. विवेकानंद वाखारे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. श्री.ज्ञानेश्वर भोसले यांच्या सूचनेनुसार पोलीस हवालदार मुकेशकुमार बडे, पोलीस नाईक गोकुळ इंगवले, पोलीस कॉन्स्टेबल आनंद मैड, संभाजी गर्जे आणि शरद चोभे यांनी हि कार्यवाही केली.

गुन्हा दाखल झाल्यानंतर अवघ्या काही तासातच सुपा पोलीस स्टेशनच्या हद्दीतून, डोंगराळ भागात शोध घेतला. आरोपीला एका झाडाखाली बसलेल्या अवस्थेत सापडल्याने लागलीच ताब्यात घेण्यात आले. या कामगिरीमुळे श्रीगोंदा पोलीसांचे कौतुक होत आहे. सदर आरोपीविरुद्ध पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येत आहे. या वेगवान आणि प्रभावी कार्यवाहीमुळे श्रीगोंदा पोलीसांचे कौतुक होत आहे.

स्रोत:(प्रसिद्धी पत्र)

जाहिरात..

Leave a Reply