सागर कोथिंबिरे यांची श्रीगोंदा युवासेना शहर प्रमुखपदी निवड..

दिनांक १२ ऑगस्ट २०२४, श्रीगोंदा:

शिवसेना पक्ष प्रमुख श्री. उद्धव ठाकरे, युवासेना प्रमुख श्री. आदित्य ठाकरे, शिवसेना उपनेते श्री. साजन पाचपुते, शिवसेना जिल्हाप्रमुख श्री. शशिकांत गाडे आणि युवासेना जिल्हाप्रमुख श्री. प्रशांत भाले यांच्या आदेशानुसार सागर सखाराम कोथिंबिरे यांची श्रीगोंदा शहरासाठी युवासेना प्रमुख म्हणून निवड करण्यात आली आहे.

सागर कोथिंबिरे यांची ही नियुक्ती तात्पुरत्या स्वरूपाची असून, सहा महिन्यांच्या कालावधीनंतर त्यांच्या कार्यक्षमता व कामगिरीच्या आधारावर ती कायम करण्यात येईल. शिवसेनेच्या हिंदुत्ववादी विचारधारेवर पुढे चालत, मराठी माणसाशी जोडलेले अतुट नाते पुढे नेत, श्रीगोंद्यातील युवाशक्तीला संघटनेच्या माध्यमातून पुढे नेण्याची अपेक्षा या निवडीमुळे व्यक्त केली जात आहे.

“८०% समाजकारण व २०% राजकारण” या ब्रीदवाक्यासोबत संघटनेची वाटचाल सुरु असून, सागर कोथिंबिरे यांच्या नेतृत्वाखाली श्रीगोंदा शहरात युवासेनेचे काम अधिक प्रभावी होईल, असा विश्वास युवासेना तालुकाप्रमुख किरण कुरुमकर यांनी व्यक्त केला.  श्री. कोथिंबिरे यांच्या पुढील कार्यासाठी त्यांना आई तुळजाभवानीचे आशीर्वाद लाभावे, अशा शुभेच्छा युवासेनेच्या वतीने देण्यात आल्या आहेत.

स्रोत:(नियुक्ती पत्र)

जाहिरात…

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading