श्रीकांत मांढरे यांची उल्लेखनीय कामगिरी: महाराजा जिवाजीराव शिंदे महाविद्यालयाचा विद्यार्थी सेट परीक्षा उत्तीर्ण..

दिनांक १२ ऑगस्ट २०२४, श्रीगोंदा:

रयत शिक्षण संस्थेच्या महाराजा जिवाजीराव शिंदे महाविद्यालयातील श्रीकांत मांढरे यांनी हिंदी विषयात पदव्युत्तर पदवी प्राप्त केल्यानंतर, प्राध्यापक पदासाठी आवश्यक असणारी राज्यस्तरीय पात्रता परीक्षा (सेट) यशस्वीपणे उत्तीर्ण केली आहे.

श्रीकांत मांढरे यांना हिंदी विभाग प्रमुख प्रा. डॉ. राजाराम कानडे आणि प्रा. देवेंद्र बहिरम यांचे मार्गदर्शन लाभले. त्यांच्या या उल्लेखनीय यशामुळे महाविद्यालयात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. महादेव जरे, उपप्राचार्य डॉ. प्रकाश साळवे आणि सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी श्रीकांत मांढरे यांचे अभिनंदन केले आहे. मांढरे यांच्या या यशामुळे महाविद्यालयाचे नाव उज्ज्वल झाले आहे, असेही त्यांनी सांगितले. श्रीकांत मांढरे यांची ही कामगिरी अनेक विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरेल, असा विश्वास महाविद्यालयाच्या शिक्षक वर्गाने व्यक्त केला आहे.

स्रोत:(प्रसिद्धी पत्र)

जाहिरात..

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading