श्रीगोंद्यात पतीकडून पत्नीचा विष पाजून खून: वैवाहिक वादातून हृदयद्रावक घटना..!

दिनांक १२ ऑगस्ट २०२४,श्रीगोंदा:

श्रीगोंदा तालुक्यातील चोराची वाडी येथे एक हृदयद्रावक घटना घडली आहे. पतीने बाहेरच्या महिलेसोबतचे संबंध ठेवू नयेत असे सांगणाऱ्या पत्नीला पतीने निर्दयतेने मारहाण करून विषारी औषध पाजले, ज्यामुळे ती महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला.

दिनांक ११ ऑगस्ट २०२४ रोजी संध्याकाळी साडेतीन वाजता ही घटना घडली. मृतक संगीता बापु दातीर (वय ५० वर्षे, रा. चोराची वाडी, ता. श्रीगोंदा, जि. अ.नगर) यांनी आपल्या पती बापु झुंबर दातीर (रा. सप्रेवाडी, ता. श्रीगोंदा) याला बाहेरील महिलेशी संबंध ठेवू नयेत असे समजावून सांगितले होते. मात्र या गोष्टीचा राग मनात ठेवून आरोपीने तिला मारहाण केली आणि विषारी औषध पाजले.

मारहाण व विषारी औषध पाजल्यानंतर गंभीर अवस्थेत असलेल्या संगीताला तातडीने सिव्हिल हॉस्पिटल, अहमदनगर येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले. परंतु, तिची प्रकृती खालावल्याने आज दिनांक १२ ऑगस्ट २०२४ रोजी पहाटे ३:३० वाजता तिचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

स्रोत:(फिर्याद)

जाहिरात…

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading