दिनांक १७ जुलै, श्रीगोंदा:
रयत शिक्षण संस्थेच्या श्रीगोंदा येथील संकुलामधील महादजी शिंदे ज्युनिअर कॉलेजचा इयत्ता बारावीचा निकाल पुणे उच्च माध्यमिक बोर्डाने ऑनलाइन जाहीर केला. या परीक्षेमध्ये विद्यालयाचे एकूण ९४ विद्यार्थी बसले होते. त्यापैकी ९३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. विद्यालयाचा निकाल ९८.९४ % लागला आहे.
विद्यालयामध्ये प्रथम क्रमांक करांडे अमर संतोष ८२%, द्वितीय क्रमांक हकीम अलिशा निसार ७६.१५% आणि तृतीय क्रमांक दरेकर ओंकार संतोष ७०% या विद्यार्थ्यांनी मिळवला.
विद्यार्थ्यांना ज्युनिअर कॉलेजचे प्रा. संतोष मगर, प्रा. दत्तात्रय तवले, प्रा.सुनिल टकले, प्रा.अशोक शेंडगे, प्रा. ईश्वर नवगिरे, प्रा. पंढरीनाथ खाडे, प्रा. चंद्रकला दरेकर प्रा.अजय गाडेकर तसेच विद्यालयाचे (प्राचार्य) तुकाराम कन्हेरकर, (उपप्राचार्य) बाळासाहेब जाधव, (पर्यवेक्षक) उत्तम बुधवंत यांचे मार्गदर्शन लाभले.
यशस्वी विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षक यांचे रयत शिक्षण संस्थेच्या मॅनेजिंग कौन्सिल सदस्य व माजी जिल्हा परिषद अध्यक्ष बाबासाहेब भोस, स्थानिक स्कूल कमिटीचे रवीशेठ दंडनाईक, प्रा. तुकाराम दरेकर यांनी अभिनंदन केले.
(स्रोत:सचिन झगडे सर यांनी दिलेली माहिती)
