श्री.छत्रपती शिवाजी विद्यालयाचे उल्लेखनीय यश..

दिनांक २३ जुलै,घोगरगाव/श्रीगोंदा:

घोगरगाव येथील रयतच्या श्री.छत्रपती शिवाजी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाचा इयत्ता बारावीचा निकाल पुणे उच्च माध्यमिक बोर्डाने नुकताच ऑनलाइन जाहीर केला. या परीक्षेमध्ये विद्यालयाचे एकूण ८६ विद्यार्थी बसले होते. त्यापैकी ८२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. विद्यालयाचा शेकडा निकाल ९५.४० % लागला आहे. विज्ञान विभागाचा निकाल १०० % व कला विभागाचा निकाल ९२.१५ % इतका लागला आहे.

विद्यालयात विज्ञान विभागात प्रथम क्रमांक कु. शेख तमन्ना तैमूर ७५.५४ %, दिव्तीय क्रमांक कु. शेख सोफीया रफीक ७३.८५% व तृतीय कु. उगले आरती बाळासाहेब ७३.०८% या विद्यार्थ्यांनी मिळवला. त्याचप्रमाणे कला विभागात प्रथम क्रमांक कु. उल्हारे प्रतिभा जालिंदर ७८.३१%, द्वितीय क्रमांक कु.उल्हारे प्रतिक्षा भगवान ७७.८४%, तृतीय क्रमांक अनभुले गौरव अंकुश ७७.३८ % या विद्यार्थ्यानी मिळवला.

यशस्वी विद्यार्थ्यांना प्रा. अशोक घोडे, प्रा. संजय बोडखे, प्रा. दीपक शेला, प्रा. संदीप तरटे, प्रा. बापूसाहेब खिळे, प्रा. गोरख वारुळे, प्रा. भाऊसाहेब शिंदे, प्रा. जितेंद्र चव्हाण, प्रा. श्रीमती जाधव, प्रा. श्रीमती वाणी, प्रा. कु. बचाटे त्याचप्रमाणे विद्यालयाचे प्राचार्य श्री. सीताराम ढूस (लाईफ मेंबर), पर्यवेक्षक अविनाश गांगर्डे (लाईफ मेंबर) यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.

यशस्वी विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षक यांचे रयत शिक्षण संस्थेच्या मॅनेजिंग कौन्सिल सदस्य व माजी जिल्हा परिषद अध्यक्ष बाबासाहेब भोस तसेच सरपंच बाळासाहेब उगले, उपसरपंच अनिताताई गारुडकर, माजी सरपंच डॉ. दिलीप भोस, स्थानिक स्कूल कमिटी सदस्य तुकाराम उगले, नामदारभाई शेख यांनी अभिनंदन केले.

स्रोत:(मुख्याध्यापक, श्री. छत्रपती शिवाजी विद्यालय, घोगरगाव यांनी प्रसिद्धीस दिलेली माहिती)

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading