जवानांची विरगाथा..रफिक शेख..(शहीद दिनांक ८ ऑगस्ट २००६ लोणीव्यंकनाथ तालुका श्रीगोंदा.)

रफिक शेख

घरची गरीबी वडील व्यसनी, शाळेत असताना नेहमी पहिला नंबर पण, परिस्थितीवर मात करण्यासाठी लोणीव्यंकनाथ रफीक अहमद शेख यांनी एफ वाय बी एस्सी मधून शाळेला अलविदा केला. दिनांक २७ / १२ / १९९४ रोजी पुणे भारतीय सैन्य दलातील सिंगल युनिट भरती झाली . यामध्ये रफीक शेख भरती झाला. सुखी आयुष्याची स्वप्न रंगविण्यास सुरु केली होती. पण गांधीनगर येथे सेवेत असताना दिनांक ८/ ८/ २००६ रोजी विजेचा धक्का बसून रफीक शेख याला वीरमरण आले .

रफीक शेख यांचे वडील शेती महामंडळाच्या बेलवंडी येथील मळ्यात मजुर म्हणून काम करत होते. दिनांक २६/ २ / १९७७ रोजी अहमद व जुबेदा यांच्या पोटी रफीक याचा जन्म झाला. नंतर खाजा यास्मीन परवीन ही मुल झाली. अशा परिस्थितीत आई जुबेदा यांनी मोलमजुरी करुन रफीक खाजा व यास्मीन परवीन या चार मुलांच्या शिक्षणासाठी संघर्ष सुरू केला .

सन १९९२ मध्ये झालेल्या दहावीच्या परीक्षेत रफीक शेख हा लोणीव्यंकनाथ येथील व्यंकनाथ विद्यालयात पहिला आला. श्रीगोंदा येथील महादजी शिंदे महाविद्यालयात बारावी केली. शालेय जीवनात नाटक विनोद नकला करण्याची विशेष आवड होती. त्यामुळे रफीक शेख याचे हुशार व गुणी विद्यार्थी म्हणून टेटस होते. मात्र, गरीबी रफीकला सारखी आडवी येत होती. रफीकला वकील होण्याची अंतःकरणातील इच्छा होती. मित्राजवळ बोलून दाखवत असे, मला वकील व्हायचे आहे .

पुढील शिक्षणासाठी रफीक शेख यांनी पुण्याला शहानुरभाई शेख या मामांकडे गेला आणि एफ वाय बी एस्सी ला प्रवेश घेतला. पुण्यात भारतीय सैन्य दलाची भरती निघाली दिनांक २७ / १२ / १९९४ रफीक भरती झाला. शिक्षणाचा प्रवास संपला आणि युध्द भुमी वरचा प्रवास सुरू झाला.

दि २१ / ११ / १९९९ रोजी अरणगाव येथील इलाही अब्दुल शेख यांची कन्या हसीना यांच्या बरोबर रफीकचा विवाह झाला. गोवा, जबलपूर, नागालँड असे पोस्टीग झाले. रफीक यांना दरम्यान काळात रफीक हसीना यांच्या संसारात सर्फराज व सना ही पुष्प उमलली सुखाचा संसार सुरू आईचे मोलमजुरीचे काम थांबले होते.

रफीक शेख हे हे ऑफीस मध्ये जाण्याच्या तयारीत असताना, इलेक्टीक शॉक बसला आणि रफीक शेख यांची प्राणज्योत मालवली. ही बातमी लोणीव्यंकनाथ येथे वाऱ्यासारखी पसरली. शेख परिवार दुःखाच्या सागरात बुडाला .

पैसे जपून वापरणार शेतात राबणाऱ्या आईची आठवण आणि लहानपणी भोगलेली गरीबी याची जाण होती त्यामुळे ते पैशाचा वापर अतिशय काटकसरीने करत असत. मुलांना शिकवू मला वकील होता आले नाही. पण, मुलगा किंवा मुलीला मी वकील करणार आणि एकदा न्यायालयाचे कामकाज पाहण्यासाठी त्यांच्याबरोबर जाणार अशी जिदद होती. माझ्यावर पत्नी म्हणून त्यांनी कधीच अधिकार गाजवला नाही. माझ्या बरोबर ते मित्र, मैत्रीणीसारखे राहायचे. असला प्रेमळ माणुस पुन्हा भेटणे नाही. हासीना शेख वीरपत्नी

शब्दांकन : राजू शेख, दै. आवाज
स्रोत:(अग्निपंख फौंडेशन)

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading