दिनांक १ मे २०२६ श्रीगोंदा:
श्रीगोंदा शहरात सध्या अल्पवयीन मुलांमध्ये वाढत चाललेल्या व्यसनाधीनतेमुळे नागरिकांमध्ये तीव्र चिंता व्यक्त केली जात आहे. विशेषतः काही नामांकित हॉटेलांमध्ये अल्पवयीन मुलांचा वावर वाढल्याचे दिसून येत असून, तेथे दिल्या जाणाऱ्या काही संशयास्पद पेयांमुळे मुलांवर विपरीत परिणाम होत असल्याची चर्चा रंगली आहे.
स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, या हॉटेलांमध्ये असे काही पेय दिले जात असल्याचा संशय आहे की, ते सेवन केल्यानंतर संबंधित व्यक्तीची मानसिक स्थिती बदलते आणि त्यांना त्या पदार्थाची सवय लागण्याची शक्यता वाढते. त्यामुळे हे प्रकरण केवळ हॉटेलपुरते मर्यादित नसून, एक गंभीर सामाजिक समस्या बनत चालले आहे.
अल्पवयीन मुलांना अशा प्रकारच्या गोष्टी सहज उपलब्ध होणे ही अत्यंत चिंताजनक बाब असून, पालकवर्गातही याबाबत अस्वस्थता निर्माण झाली आहे. “आपली मुले सुरक्षित आहेत का?” असा प्रश्न अनेक पालक उपस्थित करत आहेत.
दरम्यान, श्रीगोंद्यात अवैध धंद्यांनाही खतपाणी मिळत असल्याच्या चर्चा आहेत. काही ठिकाणी नियमबाह्य प्रकार सुरू असल्याचे बोलले जात असून, याकडे प्रशासनाने गांभीर्याने लक्ष देण्याची गरज व्यक्त केली जात आहे.
प्रशासनाची भूमिका मात्र अद्याप स्पष्टपणे समोर आलेली नाही. संबंधित विभागांनी अशा हॉटेलांची तपासणी करून, दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
👉 नागरिकांची मागणी :
अल्पवयीन मुलांना हॉटेलमध्ये प्रवेशावर नियंत्रण.. संशयित पेयांची तपासणी.. अवैध धंद्यांवर कठोर कारवाई.. नियमित पोलिस व अन्न-औषध प्रशासनाची छापेमारी करावी. शहरातील तरुण पिढी सुरक्षित ठेवण्यासाठी प्रशासनाने तात्काळ ठोस पावले उचलावीत, अन्यथा ही समस्या भविष्यात आणखी गंभीर रूप धारण करू शकते, असा इशारा सामाजिक कार्यकर्त्यांनी दिला आहे.
स्रोत:(अधिकृत माहिती)
AI चा वापर करून फोटो तयार केला आहे.















Leave a Reply