एकाच धातूच्या जाती-जातीत तुटून पडलेल्या कड्या, एकात एक गुंफून समग्र महापुरुषांच्या सम्यक, समतावादी विचारांचे प्रचारक बना: आर.एस.यादव (परभणी)

दिनांक १९ जानेवारी, श्रीगोंदा:

फुले-आंबेडकर विचार मंचचे अध्यक्ष संभाजीराव बोरुडे यांचे वडील व सुमित बोरडे यांचे आजोबा दौलतराव बोरुडे यांचे दिनांक १७ जानेवारी रोजी दुपारी तीन वाजता निधन झाले. ते १०२ वर्षांचे होते. त्यांचा दशक्रिया विधी कार्यक्रम महात्मा फुलेंच्या सार्वजनिक सत्यधर्म प्रेरित सत्यशोधक पद्धतीने आज त्यांच्या राहत्या घरी करण्यात आला. हा विधी सचिन झगडे यांनी पार पाडला. यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

https://bit.ly/bspmycityshrigonda

याप्रसंगी अध्यक्षीय भाषणात परभणी येथील आर. एस. यादव यांनी आपले मनोगत व्यक्त केले. त्यांनी आपल्या भाषणात नमूद केले की, सत्य अल्पमतात असते. आजचे समाजशास्त्र आणि घटना उद्याचा इतिहास असतो. बुद्धाने स्वातंत्र्य, समता, बंधुतेचा उपदेश दिला. त्यानुसार संतांनी काम केले. कबीराने रविदासास गुरुस्थानी मानले, नामदेवाने चोखामेळाची हाड मंगळवेढ्याच्या वेशीतून काढून, पांडुरंगाच्या देवळापुढे समाधी केली, जिवंत माणसांना गाडनं एकिकडे आहे. तर, गाडलेल्या हाडांना सॅल्युट मिळून देण, हे संतांचं नातं आहे, असेही ते म्हणाले.

पुढे त्यांनी नमूद केले की, नामाने मला जागं केलं. हे तुकाराम महाराजांनी आपल्या अभंगातून सांगितलं, तुकाराम आभाळाएवढा उंचीचा ! म्हणजे, उंचीत बुद्धिमत्ता समाविष्ट असते, याचे उदाहरण देताना त्यांनी नेपोलियन बोनापार्ट विषयी सांगितले की, नेपोलियन सम्राट होता. पण, तो उंचीने बुटका होता. एकदा अंगातला काढलेला कोट खुंटीला हात पोहचत नाही. म्हणून, लटकवता येत नव्हता, हे दारात उभा असलेल्या शिपायाने पाहिले व तो म्हणाला महाराज मी तुमच्या पेक्षा उंच आहे. मी कोट लटकवून देऊ का ? नेपोलियन यावर रागाने लाल झाला आणि म्हणाला शब्द मागे घे, तू माझ्या पेक्षा उंच नाहीस. तू माझ्यापेक्षा लांब आहेस, तू जर माझ्यापेक्षा उंच असतास ? तर, माझ्या द्वारचा द्वारपाल म्हणून राहिला असतास का ? असे यादव सर यांनी नमूद केले.

तुकाराम महाराज आभाळाएवढे उंचीचे होते, शिवाजी महाराजांनी तुकाराम महाराजांना गुरू मानले होते. तुकारामांच्या अभंग मुशीतून बनलेले शिवाजी महाराजांचे साम्राज्य जनतेसाठी समर्पित होते. शिवाजी महाराजांची समाधी हरवली होती, महात्मा फुलेंनी रयतेच्या राजाची समाधी धुंडून काढीत, ९५० ओळींचा पोवाडा लिहिला. महात्मा फुले शेवटच्या ग्रंथाचे लिखाण करत असतांना, त्यांच्या उजव्या अंगावरून वारे गेल्याने, महात्मा फुले डाव्या हाताने जिकिरीचे प्रयत्न करीत, तो ग्रंथ लिखाण पूर्ण करीत होते. यावर लोक त्यांना त्रास करून घेऊ नका, असे म्हणत. महात्मा फुले म्हणतात की, मला जे माहीत झाले ते लोकांना या माध्यमातून समजले पाहिजे.

त्यांच्या मृत्यूनंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी महात्मा फुलेंना गुरू मानले आणि त्यांना गुरु म्हणण्यात मला अभिमान वाटतो. असे गौरवोद्गार काढले. शाहू महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना भेटायला घरी गेल्यावर महाराज मी भेटायला आलो असतो, असे डॉक्टर आंबेडकर शाहू महाराज म्हणाले. मात्र, शाहू महाराज बाबासाहेबांना म्हणाले की, आम्ही परंपरेचे राजे असून, ज्ञानाचे राजे तुम्ही आहात. त्यामुळे एका राजाला दुसरा राजा भेटण्यास कसली चिंता ? असे ते म्हणाले

अशा पद्धतीने महापुरुषांनी कधीही जातीभेद केला नाही. आभाळाएवढ्या माणसांमुळे जातीविरहित समाजाची निर्मिती झाली. असे यादव सरांनी आपल्या भाषणात सांगितले. या कार्यक्रमासाठी विजय चव्हाण (दौंड), ह.भ.प. बाळासाहेब धोत्रे महाराज (पिंपरी कोलंदर), डॉक्टर रफिक सय्यद (पारनेर), गणेश फरतले (वडु बुद्रु) यांनी मार्गदर्शन केले.

मुकुंद सोनटक्के व बाप्पू माने यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. तर, घनश्याम आण्णा शेलार, आघाव भाऊसाहेब, अनिल ठवाळ, सौ. अनुराधा ताई ठवाळ, नानासाहेब शिंदे, संजय गायकवाड (कुशेगाव), महेंद्र शिंदे, साहेबराव रासकर, चंद्रकांत थोरात, पत्रकार राजु शेख, अमीनभाई शेख, चंद्रकांत सकट, सुरेश चव्हाण (सर), नगरसेवक संतोष खेतमाळीस, संतोष इथापे, सुरज घोडके, सलीम भाई शेख सह सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, पत्रकारिता, व्यवसायिक, विधी व न्याय क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

स्रोत:(आयोजीत कार्यक्रम)

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading